पंढरीत भाविकांची गर्दी होऊ नये. यासाठी पोलीस प्रशासनाने १६०० पोलिसांचा बंदोबस्त लावला आहे. कडक नाकाबंदी असल्यामुळे मंदिर परिसरात भाविकांनी गर्दी केली नाही. यामुळे भाविकांनी सैदव गजबजलेला मंदिर परिसर रिकामा होता. त्याच बरोबर कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने पंढरपुरात संचारबंदी केल्यामुळे इतर जिल्ह्यातून दिंड्या आल्या नाहीत. मात्र काही मोजक्या परंपरागत दिंड्यांनी यात्रा पूर्ण केली आहेत. यामध्ये स्थानिक दिंड्याचा सहभाग होता. या दिंड्या आपल्या मठापासून काही मोजक्या वारकऱ्यांसह निघाल्या. त्या प्रत्येक दिंड्या चंद्रभागेत पोहोचल्या, परंतु त्यांनी चंद्रभागेत स्नान केले नाही. पुंडलिक दर्शन घेऊन, विठ्ठल मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन प्रदक्षिणा मारुन आपली माघी यात्रेची परंपरा पूर्ण केली.
------
आणखी एक दिवस विठ्ठल मंदिर बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माघी यात्रेतील दशमी व एकादशी दिवशी श्री विठ्ठल मंदिर भाविकांसाठी बंद ठेवले आहे. द्वादशीला भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करु शकतात. गर्दी झाल्यास कोरोना विषाणूचा प्रसार व प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. यामुळे २४ फेब्रुवारी रोजीही मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह. भ. प. गहनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.स
फोटो
२३पंढरपूर-दिंडी
ओळी
चंद्रभागा वाळवंटातील पुंडलिक मंदिराचे दर्शन घेऊन जाताना छोट्या छोट्या दिंड्या. (छाया - सचिन कांबळे)