नासीर कबीर
करमाळा : कोरोनाचं संकट आलं.. साºयांच्याच नशिबी लॉकडाऊनचं जिणं आलं. कामधंदा बंद झाला. इथं राहून काय उपयोग म्हणून अनेकांनी गाव गाठलं तसं हजारवाडीच्या तरुणानंही चालत गाव गाठलं. पण, इथंही त्याचं नशीब आडवं आलं. गावकºयांनी अन् नातलगांनी त्याला संशयित म्हणून दूर लोटलं. अखेर गेल्या पाच दिवसांपासून त्याला गावालगतच्या फॉरेस्टमध्ये राहण्याची वेळ आली आहे.
पुण्यातील कामधंदा बंद झाल्याने हजारवाडी (ता. करमाळा) या आपल्या गावाकडे आश्रयासाठी आलेल्या सोमनाथ सर्जेराव हजारे या युवकास घरातील आई व भाऊ यांसह गावकºयांनी कोरोनाचा संशयित रुग्ण म्हणून गावात राहू न दिल्याने सोमनाथ चक्क गावाशेजारील वनविभागाच्या जंगलात गेल्या पाच दिवसांपासून एकटाच राहत आहे.
सोमनाथ हा मूळचा करमाळा तालुक्यातील पोफळजशेजारील हजारवाडीचा. कामधंद्याच्या निमित्ताने पुणे येथील लोणी परिसरात वायरमन म्हणून काम करून आपली उपजीविका भागवायचा. पण, कोरोना विषाणूचा फैलाव पुणे परिसरात झाल्याने भीतीने सोमनाथच्या खोलीतील सर्वच मित्र आपापल्या गावी निघून गेले. त्यामुळे सोमनाथही चालत आपल्या गावाकडे निघाला. अवघे दहा ते पंधरा कि.मी. एवढ्याच अंतराची सोमनाथला लिफ्ट मिळाली. तो सलग आठ दिवस चालत टेंभुर्णीत आला व तेथून जेऊर येथे एका रिक्षाने आला.
सोमनाथने जेऊर येथील शासकीय रुग्णालयात स्वत: जाऊन ‘मी बाहेर गावाहून आलोय,’ असे सांगून तपासणी करून घेतली. डॉक्टरांनी सोमनाथच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारला. गावी जाऊन घरातच राहण्याचा सल्ला दिला, पण सोमनाथची आई, भाऊ यांच्यासह गावकºयांनी सोमनाथला घरी राहण्यास विरोध केल्याने त्याने चक्क गावाशेजारील जंगलात राहून चौदा दिवस काढायचे ठरवले. गेल्या पाच दिवसांपासून सोमनाथ चक्क जंगलात एकटाच वास्तव्य करून राहत आहे.
याला पोाफळज-हजारवाडी ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच दत्तात्रय गव्हाणे, पोलीस पाटील परमेश्वर हजारे, माजी सरपंच दादा हाके यांच्यासह गावकामगार तलाठी व ग्रामसेवक यांनी सोमनाथची गावच्या शाळेत राहण्याची व्यवस्था करू, असे सांगितले.परंतु गावकºयांनी सोमनाथला गावात राहण्यासच तीव्र विरोध केला. सोमनाथ राहत असलेल्या जंगलात त्याच्या जेवण-पाण्याची सोय सरपंच दत्तात्रय गव्हाणे करीत आहेत.
विनाकारण संशयी नजरेनं पाहतात- मला कोरोना झालेला नाही. मी ठणठणीत आहे. मी स्वत: जेऊर येथे सरकारी रुग्णालयात जाऊन तपासणी करून आलो आहे. सध्या मला कुठलाही त्रास होत नाही. असे असताना मला गावकºयांनी राहू दिले नाही, याचे वाईट वाटते. लोक आता माझ्याकडे संशयाच्या नजरेने पाहतात. मी पाणी मागितले तरी पळून जातात. हे सारं बघून जगणं नकोसं वाटू लागलंय, अशा भावना सोमना हजारे या तरुणानं ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.
सोमनाथ हजारे कित्येक वर्षांपासून पुण्याला राहतो. त्याचे घरच्यांबरोबर भांडण आहे. तो येथे आल्यानंतर त्याला घरच्या लोकांसह गावकºयांनी गावात राहण्यास विरोध केला. त्यामुळे तो जंगलात राहत आहे. त्याची राहण्याची व्यवस्था करण्यात येईल.- अडगळे, तलाठी हजारवाडी-पोफळज