मोहोळ नगर परिषदेच्यावतीने सन २०१९- २० या कालावधीमध्ये रमाई आवास योजनेअंतर्गत १८९ पैकी २८ जणांच्या फाईली गायब झाल्या होत्या. त्यासाठी मोहोळ नगरपरिषदेसमोर संबंधीत अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी शिवसेना मोहोळ शहरच्यावतीने अशोक गायकवाड, विजय सरवदे, सतीश क्षीरसागर यांनी २८ जूनपासून नगरपरिषदेच्या कार्यालया समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. २९
जून रोजी नगरपरिषदेचे प्रभारी अधिकारी श्रीकांत लाळगे यांनी संबंधित २८ लाभार्थ्यांच्या फाईली नव्याने तयार करून लाभ दिला जाईल, असे पत्र दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी अशोक गायकवाड, विजय सरवदे, सतीश क्षीरसागर, अविनाश क्षीरसागर, बालाजी क्षीरसागर, आकाश क्षीरसागर, गणेश उघडे, राहुल क्षीरसागर, रोहन बनसोडे, सुशांत बनसोडे, विशालबनसोडे, हरिभाऊ क्षीरसागर, सचिन क्षीरसागर आदी उपस्थित होते.
-----
फोटो : २९ मोहोळ
आंदोलनकर्त्यांना पत्र देताना नगरपरिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे, प्रशासन अधिकारी सुवर्णा हाक्के, सेनेचे तालुका प्रमुख
अशोक भोसले आदी.