बार्शी : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्यातील न्यायालयाचे कामकाज दीड वर्षानंतर पूर्णवेळ पूर्ववत झाले. लेखी आदेश प्राप्त होताच बार्शी न्यायालयातही ७ सप्टेंबरपासून कामकाज पूर्णवेळ झाले. पहिल्याच दिवशी न्यायाधीश तेजवतसिंग संदू यांनी पक्षकारांनी तडजोडीने वाद सोडवल्यास वेळ आणि पैसे वाचतील अशी अपेक्षा व्यक्त केली.
काम सुरू होताच पहिल्याच दिवशी बार्शीत दुपारच्या सत्रात वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश तेजवतसिंग संदू यांनी मध्यस्थी जनजागरण अभियानांतर्गत बार्शी वकीलसंघ येथे एम. पी. धस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावून दिवाणी व फौजदारी प्रकरणांत मध्यस्थाची भूमिका व कर्तव्य यांवर मार्गदर्शन केले. पक्षकारांनी तडजोडीने वाद सोडवल्यास वेळ आणि पैसे वाचतील. त्यासाठी वकील व मध्यस्थाची भूमिका ही समाजाच्या दृष्टीने किती महत्त्वाची, हे समजून सांगितले.
यावेळी वकील संघाचे ज्येष्ठ विधिज्ञ अनिल पाटील, शैला क्षीरसागर, एड. टिकटे यांनी मार्गदर्शन केले.
------