सोलापूर : पोलिसांशी चर्चा करुनच रेल्वे स्टेशन परिसरातील गांधी पुतळ््याच्या सर्कलमध्ये आंदोलनाचा मंडप घालण्यात आला होता. तरीही महापालिकेकडून गुन्हा दाखल होत असेल तर याविरोधात पुन्हा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे - पाटील यांनी दिला आहे.
महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार यांच्यासह पदाधिकाºयांनी भाजपा सरकारविरोधात गांधी पुतळ््याच्या सर्कलमध्ये मूक आंदोलन केले होते. यासाठी १ आॅक्टोबर रोजी रात्री स्टेशन रोडवरील चादर दुकानाजवळ मंडप घालण्यात आला होता. मात्र तो रात्री हटविण्यात आला. पोलिसांसोबत चर्चा केल्यानंतर तो पुतळ््याच्या सर्कलमध्ये मंडप घालण्यात आला.
या प्रकरणाची चौकशी करुन संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल करावेत, असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी नगर अभियंत्यांना दिले आहेत. याबाबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे म्हणाले, पोलिसांशी चर्चा करुनच गांधी पुतळ््याच्या सर्कलमध्ये मंडप घालण्यात आला. महापालिकेच्या अधिकाºयांनी शहराध्यक्षांना नोटीस बजावली आहे. त्या नोटीशाला उत्तर दिले जाईल. उत्तर दिल्यानंतरही गुन्हा दाखल केला जात असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस मागे हटणार नाही. या दडपशाहीविरोधात पुन्हा आंदोलन उभारण्यात येईल.
सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीर मंडप घालणाविरुध्द कारवाई करावी लागेल. गांधी पुतळ््याजवळील मंडप प्रकरणी नगर अभियंत्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यांना याबाबत विचारणा करण्यात येईल. डॉ. अविनाश ढाकणे, आयुक्त, महापालिका.