माढा तालुक्यातील अंबाड, शिराळ, लऊळ, भेंड, पिंपळखुंटे या गावचे शेतकरी व मनसेच्या वतीने महावितरणने वीजपुरवठा त्वरित सुरळीत करावा, या मागणीसाठी १६ मार्च रोजी निवेदन दिले होते. अन्यथा, मनसेच्या वतीने अंबाड येथे रास्ता रोको करण्याचा इशारा दिला होता. परंतु, याची महावितरणने दखल घेतली नाही. त्यामुळे मनसेच्या वतीने १८ मार्च रोजी सकाळी अंबाड येथील कुर्डुवाडी-टेंभुर्णी मार्गावर रास्ता रोको सुरू केला. यात परिसरातील शेतकऱ्यांनीही सहभाग नोंदविला.
यादरम्यान शेतकरी व मनसे पदाधिकारी आक्रमक होत असल्याचे पाहून महावितरणचे अधिकारी त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांच्यासमोर शेतकरी आपले गाऱ्हाणे मांडत असतानाच आ. बबनराव शिंदे याच मार्गावरून एका कार्यक्रमासाठी जात होते. तेही अचानक आंदोलनस्थळी आले. आंदोलनकर्त्यांचे म्हणणे ऐकून आमदारांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना संबंधित गावचा वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना केल्या. शिवाय शेतकरी, मनसे कार्यकर्त्यांना आंदोलन मागे घेण्यास सांगितले. या परिसरात वीजपुरवठा सुरू झाल्याने अखेर शेतकऱ्यांनी व मनसे पदाधिकाऱ्यांनी आंदोलन स्थगित केले.
या आंदोलनात मनसेचे राज्य सरचिटणीस दिलीप धोत्रे, जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, सागर लोकरे, बाळासाहेब टोणपे, दिलीप जोशी, आकाश लांडे, सागर बंदपट्टे, सागर गरदडे, उमेश माने, अण्णासाहेब शेटे, सोमनाथ पवार, बालाजी गाडे, खंडू बडे, समाधान कदम, सौदागर कदम, अजय टोणपे, समाधान गायकवाड, समाधान गाडे, राहुल गाडे, अरविंद टोणपे, पप्पू धुमाळ या पदाधिकाऱ्यांच्या बरोबर अंबाड, शिराळ गावचे पितांबर गाडे, विजय पाटील, चंद्रकांत टोणपे, अमित गाडे, दिलीप टोणपे, सुनील कदम, शंकर कदम, अण्णासाहेब महिंगडे, सचिन गाडे, अनिल टोणपे, गणेश कदम, विशाल गाडे, गणेश लोकरे, अमोल टोणपे उपस्थित होते. आंदोलनादरम्यान एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
फाेटो
१८कुर्डुवाडी-आंदोलन
ओळी
अंबाड येथे रास्ता रोकोदरम्यान आ. बबनराव शिंदे आल्यानंतर त्यांना वीजपुरवठा सुरळीत करण्याचे निवेदन देताना शेतकरी व मनसे पदाधिकारी.