राकेश कदम
जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून ५ तेे ९ मार्च यादरम्यान जिल्हा कृषि महोत्सवाचे आयाेजन करण्यात आले आहे. या महाेत्सव प्रशासनाच्या सर्व यंत्रणांचा सहभाग असेल, अशी माहिती आयोजन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी साेमवारी दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी साेमवारी यासंदर्भात सर्व यंत्रणांची बैठक घेतली.
जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले, कृषिविषयक तंत्रज्ञानाचा प्रसार, शासकीय योजनांची माहिती देणे, शेतकरी – शास्त्रज्ञ संशोधन – विस्तार प्रक्रिया व विपणन साखळी निर्माण करणे, शेतकरी उत्पादक कंपन्यांची क्षमता बांधणी, शेतकरी ते ग्राहक थेट विक्री शृंखला आदि या महोत्सव आयोजनाचे हेतू आहेत. यावेळी जिल्हा अधीक्षक बाळासाहेब शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी जयवंत कवडे, आत्माचे प्रकल्प संचालक मदन मुकणे, जिल्हा परिषदेचे विवेक कुंभार आदी उपस्थित हाेते.
येथे हाेणार प्रदर्शनसाेलापुरातील लक्ष्मी विष्णू मिल मैदान येथे कृषी महाेत्सव हाेईल. यात कृषी प्रदर्शन, विविध परिसंवाद, चर्चासत्रे, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री सुविधा, विक्रेता खरेदीदार संमेलन यांच्यासह जिल्ह्यातील कृषी व संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेले शेतकरी व पीकस्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.