सोलापूर : अहमदाबाद- चेन्नई - अहमदाबाद हमसफर एक्सप्रेसच्या कोचसमध्ये वाढ करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यामुळे या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास आता सोयीस्कर होईल. या गाडीला सध्या १० तृतीय श्रेणी वातानुकूलित, ६ शयनयान, २ गार्ड ब्रेक कम लगेज वॅन असे एकूण १८ कोच आहेत. यात आता सुधारित १२ तृतीय श्रेणी वातानुकूलित, ६ शयनयान, २ गार्ड ब्रेक कम लगेज वॅन असे एकूण २० कोच असणार आहेत.
हा बदल आज १ जूलै पासून होणार आहे. म्हणजेच अहमदाबाद- चेन्नई हमसफर एक्सप्रेसला तर ३ जुलै पासून चेन्नई - अहमदाबाद हमसफरमध्ये परिवर्तन करण्यात येईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. दरम्यान या गाडीचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.