जागतिक एड्स दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालय येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कोरोनामुळे तपासणीच्या प्रमाणात घट झाली आहे. ते प्रमाण शिबिराच्या माध्यमातून वाढवून दुर्लक्षित एच. आय. व्ही. संक्रमितांपर्यंत पोहोचून त्यांना उपचारावर आणण्याची गरज आहे, असे डॉ. प्रमोद शिंदे यांनी सांगितले. एच.आय.व्ही बाधित व्यक्ती समाजात सर्वसामान्य आयुष्य जगत आहेत. यावेळी बाधित व्यक्तींबद्दल होणारे गैरसमज, प्रसार-उपचार याबद्दल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पद्माकर अहिरे यांनी माहिती दिली. यावेळी दंत शल्यचिकित्सक डॉ. किरण पोटे, डॉ. ऋचा वैद्य, वैद्यकीय अधिकारी डॉ. शिरीष कुलकर्णी उपस्थित होते.
प्रास्ताविकात प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी स्वाती शिंदे यांनी एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्रामुळे एचआयव्ही बाधितांचे प्रमाण आटोक्यात आले असून, यावर्षी मंगळवेढा तालुक्यात एकही गरोदर माता बाधित नसल्याचे सांगितले. समुपदेशक आबासाहेब सोनवणे यांनीही उपचाराबद्दल सहकार्य मिळत असल्याचे सांगितले. डॉ. किरण पोटे यांनी आभार मानले.
यावेळी वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक प्रल्हाद नाशिककर, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी विजय येळदरे, सुजाता कुंभार, पूजा माळी, औषध निर्माण अधिकारी पांडुरंग कोरे, महेंद्रसिंह सोळंकी, रेश्मा सरडे अधिपरिचारिका हिरकणी हेंबाडे, ठोकळे, वैशाली शिंदे, सोनाली शंकर, सारिका कोळेकर, रूपाली कुलकर्णी, विकी रोकडे, जमीर मुल्ला यांचे सहकार्य लाभले.
फोटो ओळी ::::::::::::::::::::::
ग्रामीण रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त कार्यक्रमात बोलताना वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद शिंदे. व्यासपीठावर वैद्यकीय अधिकारी डॉ. पद्माकर अहिरे, डॉ. किरण पोटे, डॉ. ऋचा वैद्य, स्वाती शिंदे,
आबासाहेब नागणे आदी.