शहरातून नव्याने सातारा-लातूर महामार्ग व आळंदी-मोहोळ महामार्ग जात आहेत. आळंदी-मोहोळ महामार्गाला बाह्यवळण रस्ता केला जाणार आहे. मात्र, सध्या शाळा सुरू होणे व सुटण्याच्या वेळेला, आठवडी बाजार, सण, समारंभ महत्त्वाच्या दिवशी शहरवासीयांना गर्दी व वाहतुकीच्या कोंडीचा सामना करावा लागत आहे. याशिवाय ऊसतोडणी हंगामावेळी आसपासच्या साखर कारखान्यांना ये-जा करणाऱ्या उसाच्या वाहनांची यात भर पडत आहे. अशा गर्दीच्या रस्त्याने काही वाहनचालक भरधाव वेगाने वाहने चालवितात. यावर गतिरोधकांमुळे नियंत्रण येऊ शकते. यामुळे शहरातील नागरिकांमधून आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक करावे, अशी मागणी जोर धरत आहे.
गतिरोधकांची गरज असलेली ठिकाणे
पेट्रोल पंप, कन्या प्रशाला, सावता माळी मंदिर, गोपाळराव देव प्रशाला, सेंट मेरी स्कूल, समीर गांधी महाविद्यालय, श्रीनाथ विद्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती, बस स्थानक, पोलीस ठाण्यात जाणारा रस्ता, मारुती मंदिर, अहिल्यादेवी उद्यान याव्यतिरिक्त इतरत्र काही ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या रस्त्यांचे चौक आदी महत्त्वाच्या ठिकाणी होणाऱ्या गर्दीला आळा घालण्यासाठी ‘स्पीड बेकर’ची मागणी नागरिकांतून पुढे येत आहे.
कोट ::::::::::::::::::::::::::::
वृद्ध नागरिक व शाळेतील विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. याबाबत शाळा व काही चौकांतील गतिरोधकाबाबत संबंधित विभागाच्या कार्यालयांशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र, तरीही गतिरोधकांबाबत प्रशासन व लोकप्रतिनिधी निरुत्साही दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांना यासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागणार आहे.
- श्रीकांत पंचवाघ,
नागरिक, माळशिरस