सोलापूर : रत्नागिरी - नागपूर - विजयपूर राष्ट्रीय महामार्गासाठी जमीन अधिग्रहण प्रश्नासंदर्भात अखिल भारतीय किसान सभा, सांगलीच्यावतीने शनिवारी सहकारमंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या घरावर मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा पोलीसांनी अडवून मोर्चातील शेतकºयांवर लाठीमार केला. याचवेळी किसान सभेचे सरचिटणीस अजित नवले यांना पोलीसांनी धक्काबु्क्की केली़ जोपर्यंत शेतकºयांना मारहाण करणाºया पोलीस अधिकाºयांवर कारवाई होणार नाही तोपर्यंत हा मोर्चा मागे हटणार नाही अशी भूमिका अजित नवले यांनी घेतली.
रत्नागिरी-नागपूर- गुहाघर विजयपूर महामार्गासाठी शेतकºयांच्या जमिनी अधिग्रहित करण्याचे काम सुरू आहे़ प्रशासनाने प्रसारमाध्यमातून जाहिरात देऊन शेतकºयांनी आपले म्हणणे प्रशासनास मांडले़ मात्र प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची सुनावणी न घेता जमिनी अधिग्रहीत केल्याचे जाहीर केले़ ही शेतकºयांची मुस्कटदाबी करण्याचे काम सुरू आहे़ अशा कृत्यांना सक्त विरोध करीत किसान सभेने अंकली (ता़ सांगली) येथुन मिरज येथुन जत्था सुरू केला आहे.
हा जत्था शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास भैय्या चौकात दाखल झाला. भैय्या चौकातून शेतकºयांच्या व्यस्था मांडण्यासाठी हा जत्था सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या घरावर काढण्यात आला. मात्र सहकारमंत्र्याच्या घराकडे जात असताना शहरातील विविध भागात या मोर्चेकरांना अडवून त्यामधील सहभागी शेतकºयांनावर पोलीसांनी लाठीमार केल्याचा आरोप अजित नवले यांनी केला़ मागील दोन तासांपासून सहकारमंत्री यांच्या घरासमोर किसान सभेचे ठिय्या आंदोलन सुरू आहे़ कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.