जीआरचा उल्लेख करताच बारामतीचे 'मिलेट' रद्द करण्याची अजित पवारांनी दाखवली तयारी
By बाळकृष्ण दोड्डी | Published: February 3, 2024 01:54 PM2024-02-03T13:54:50+5:302024-02-03T13:55:11+5:30
जीआर वाचल्यानंतर सोलापूरचे प्रकल्प बारामतीला गेल्याची माहिती निदर्शनास आणून दिली.
सोलापूर : सोलापूर अन् बारामतीला मंजूर झालेले मिलेट सेन्टर वेगवेगळे आहेत. एखाद्या ठिकाणी मंजूर झालेले प्रकल्प पळवून नेण्याचा स्वभाव माझ्या रक्तात नाही, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर अन् बारामती मिलेट सेन्टर प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. परंतू, पत्रकारांनी मिलेट सेन्टरच्या जीआरचा उल्लेख केला.
जीआर वाचल्यानंतर सोलापूरचे प्रकल्प बारामतीला गेल्याची माहिती निदर्शनास आणून दिली. त्यानंतर, अजित पवार यांनी जीआर दुरुस्ती करायला लावू असे सांगत वेळ पडल्यास बारामतीचे सेन्टर रद्द करण्याची तयारी देखील त्यांनी दाखवली. उपमुख्यमंत्री अजित पवार हे शनिवारी सोलापूर दौऱ्यावर आहेत. सकाळी साडे दहा वाजता नियोजन भवनात पाणी व चारा टंचाई संदर्भात बैठक घेतली. बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मिलेट सेन्टर बद्दल माहिती दिली.