यावेळी जिल्हा उपाध्यक्ष युवराज पाटील, शहराध्यक्ष सुधीर भोसले, लतिफ तांबोळी, ॲड. दीपक पवार, अरुण आसबे उपस्थित हाेते.
पुढे साळुंखे म्हणाले, मोठ्या पक्षामध्ये पक्षांतर्गत वाद सुरु असतात. पंढरपुरातील राष्ट्रवादीमधील पक्षांतर्गत वाद मिटण्याच्या मार्गावर आहेत. आ. भारत भालके यांचे निधनानंतर पंढरपूर मतदारसंघाची पोटनिवडणुक जाहीर झाली असून, कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, निरीक्षक सुरेश घुले, महिला निरीक्षक दीपाली पांढरे रविवारी दौऱ्यावर येत असल्याचे साळुंखे सांगितले.
उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशीच समजेल उमेदवाराचे नाव
पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीची उमेदवारी मिळावी यासाठी कोण कोण उमेदवार राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. असा प्रश्न विचारला असता त्यावर दीपकआबा साळुंखे म्हणाले, मी एक कार्यकर्ता आहे, उमेदवार कोण असणार कसे सांगणार. पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशीच उमेदवाराचे जाहीर होऊ शकेल असा अंदाज त्यानी बांधला आहे.