सत्तेत आल्यास नोकरीत स्थानिक तरुणांना 75 टक्के आरक्षण देणार, अजित पवारांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 01:32 PM2019-07-26T13:32:29+5:302019-07-26T14:29:27+5:30

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज सोलापुरात मोठी घोषणा केली आहे.

Ajit Pawar's big announcement will give 75 percent reservation to local youths if they come to power | सत्तेत आल्यास नोकरीत स्थानिक तरुणांना 75 टक्के आरक्षण देणार, अजित पवारांची मोठी घोषणा

सत्तेत आल्यास नोकरीत स्थानिक तरुणांना 75 टक्के आरक्षण देणार, अजित पवारांची मोठी घोषणा

Next

सोलापूरः राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज सोलापुरात मोठी घोषणा केली आहे. सत्तेत आल्यास नोकरीत स्थानिकांना 75 टक्के आरक्षण देणार असून, त्यासाठी कायदा करणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. विधानसभेसाठी राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत.

राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे, दिलीप सोपल यांनी उमेदवारीच्या मुलाखतीकडे पाठ फिरवली आहे, बबन शिंदे भाजपाच्या तर दिलीप सोपल शिवसेनेच्या वाटेवर असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मुलाखतीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. वंचित आघाडीच्या नेत्यांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी. 

विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीसोबतजाण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा प्रयत्न आहे. वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी समंजस भूमिका घ्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार म्हणाले, वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी आघाडीबाबत काहीही वक्तव्य केले असले तरी आम्ही ते दुखावतील असे उत्तर देणार नाही. पण समविचारी पक्षांनी एकत्र यावे, असा आमचा प्रयत्न राहणार आहे. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळे मतविभाजन झाले, अन्यथा सोलापूरचा निकाल वेगळा असता, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Ajit Pawar's big announcement will give 75 percent reservation to local youths if they come to power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.