मार्च, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. नंतरच्या कालावधीत लोकांचा प्रतिसाद वाढू लागला. मात्र, लसीचा तुटवडा भासू लागला. रविवारी प्रशासनाकडून एकाच दिवशी १००० लोकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट्य ठेवून सकाळी सुरुवात केली. तेव्हा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. शहरात चार ठिकाणी लसीकरण केंद्राचे आयोजन केले होते. त्या ठिकाणी ७४२ जणांनी लस घेतली आहे.
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी अचानकपणे सर्व केंद्रावर भेटी देऊन परिस्थिती जाणून घेतली. आजवर तालुक्यात लसीकरणाला मिळालेला प्रतिसाद, एकूण आकडेवारी, कोणत्या गावात काय परिस्थिती आहे याची माहिती घेतली. यावेळी अधिकाऱ्यांनी आणखी गतीने काम करण्यासाठी काही सूचना केल्या. नागरिकांना जास्तीत जास्त लस दिल्याने तालुका सुरक्षित राहण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. लस घेतल्याने पुन्हा कोरोना होणार की नाही यापेक्षा लस घेतल्याने निश्चितपणे मृत्यू होणार नाहीत, ही मात्र खात्री असल्याचे सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे, नगरसेवक महेश हिंडोळे, कांतू धनशेट्टी, नागराज कुंभार उपस्थित होते.
रविवार सुटीचा दिवस असतानाही तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विन करजखेडे, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अशोक राठोड, विस्तार अधिकारी महेश भोरे, शिवाजी चंदनशिवे, सुरेश भास्कर, कर्मचारी राजशेखर लोकापुरे, शंकर कुंभार, आरोग्य सेविका प्रमिला वाघमारे, प्रीती राठोड, पूजा राठोड, एन. एस. चव्हाण, शीतल पाटील, नागम्मा नंदे, सेवक बसवराज माळी, डी. यू. चव्हाण, पी. एस. गवंडी, विनोद ढंगे, तसेच रमेश कापसे, रामचंद्र समाणे यांच्यासह नगरपालिका शाळेच्या ९ शिक्षकांनी परिश्रम घेतले.
या केंद्रावर लसीकरण
अक्कलकोट शहरात ग्रामीण रुग्णालय, जुना तहसील कार्यालय, कारंजा चौक उर्दू शाळा, बुधवार पेठ कन्नड शाळा या चार ठिकाणी ४०८, तर हत्तीकणबस, चुंगी या छोट्याशा प्राथमिक उपकेंद्र ठिकाणी अनुक्रमे १००, १०१ असे मिळून एकाच दिवशी ग्रामीण भागात ३३४ लोकांनी लस घेतली आहे. नगरपालिकेने उर्दू शाळा चुकीच्या ठिकाणी निवडल्याने सर्वाधिक कमी संख्या लसीकरण झाले आहे.
फोटो
११अक्कलकोट०१
ओळ
अक्कलकोट शहरातील बुधवार पेठ येथे कन्नड शाळेत लसीकरणाला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद देत रांगेत लस घेतली.