टाळे ठोकणे, निवेदन देणे, हल्लाबोल करणे हे कार्य आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सकाळी ११ वाजता करण्यात आले. एमएसईबीकडून शेतकऱ्यांना वीज तोडण्याची नोटीस दिली जात आहे. ते थांबविण्यात यावे. लॉकडाऊन कालावधीत घरगुती बिल अमाप आलेले असून त्यामध्ये सवलत द्यावी, अशा विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार बालाजी बनसोडे, महावितरणचे उपमुख्य कार्यकरी अधिकारी संजीवकुमार म्हेत्रे यांना देण्यात आले.
यावेळी भाजप तालुध्यक्ष मोतीराम राठोड, शहराध्यक्ष शिवशरण जोजन, नगरसेवक महेश हिंडोळे यांनी भाषणात राज्यसरकारचा निषेध केला. याप्रसंगी उपसभापती आप्पासाहेब पाटील, संचालक आप्पासाहेब बिराजदार, नगरसेवक यशवंत धोंगडे, परमेश्वर यादवाड, अप्पू परमशेट्टी, मिलन कल्याणशेट्टी, दीपक जरीपटके, प्रदीप जगताप, शिवशरण वाले, प्रभाकर मजगे, प्रदीप पाटील, सैपन मुजावर, ऋषी लोणारी, राजकुमार भागानगरे, मल्लिनाथ करपे, राजेंद्र बंदीछोडे, कय्युब पिरजादे, दयानंद बिडवे, श्रीशैल ठोंबरे, नागराज कुंभार, रमेश उप्पीन, आलम कोरबू, रमेश कापसे, सोमनाथ पाटील, दयानंद बमनळी, अप्पू स्वामी, मल्लिनाथ ढब्बे, कांतू धनशेट्टी, शंकर उणदे, धनंजय गाढवे, उमेश गाढवे, भीमाशंकर तोरणगी, निगप्पा पाटील, निरंजन चलगेरी उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक के. एस. पुजारी, सहा. पोलीस निरीक्षक देवेंद्र राठोड, गोपनीय विभागाचे धनराज शिंदे यांच्यासह १२ पोलीस अंमलदार यांचा कडक बंदोबस्त ठेवला होता.
फोटो
०५अक्कलकोट - एमएसईबी टाळे
ओळी अक्कलकोट येथे एमएसईबी कार्यालयास विविध मागण्या करीत टाळे ठोकत असताना आमदार सचिन कल्याणशेट्टी, मोतीराम राठोड, आप्पासाहेब पाटील, आप्पासाहेब बिराजदार, शिवशरण जोजन, महेश हिंडोळे, आदी.