गायकवाड यांनी सभापती होताना सव्वा वर्षांचा तोंडी करार करण्यात आला होता. त्यामुळे राजीनाम्याच्या घडामोडी तीन महिन्यांपासून सुरू होत्या. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आली होती. त्याची पुन्हा मागील दोन दिवसांपासून माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या उपस्थितीत चर्चा होऊन राजीनामा देण्यावर एकमत झाले. त्यानुसार सोमवारी सुनंदा गायकवाड यांनी आपल्या सभापतिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे मुगळी गणाचे सदस्य आनंद सोनकांबळे यांना सभापती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राजीनामा देताना उपसभापती प्रकाश हिप्परगी, सदस्य अनिता ननावरे, यांच्यासह सिद्धार्थ गायकवाड, नितीन ननावरे आदीजण उपस्थित होते.
----
नव्याने संधी मिळालेल्यांना कमी कालावधी
राजीनामा कार्यवाही पूर्ण होण्यासाठी किमान एक महिन्याचे कालावधी लागणार आहे. नव्याने संधी मिळणाऱ्यांना ८ ते ९ महिने कालावधी मिळणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कै. सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्या हयातीत सोनकांबळे यांना दिलेला ‘शब्द’ पूर्ण होत असल्याचे चर्चा काँग्रेस गोटातून होत आहे.