शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

अक्कलकोट : कॅशबुक पूर्ण करण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

By admin | Published: May 11, 2014 12:22 AM

नपा कॅशबुक चार वर्षांपासून अपूर्ण

अक्कलकोट : नगरपालिका कॅशबुक गेल्या चार वर्षांपासून अपूर्ण आहे़ त्वरित पूर्ण करा, असा आदेश देत पूर्ण न करणार्‍या संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करून निलंबित केले जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ़ प्रवीण गेडाम यांनी सांगितले़ जिल्हाधिकार्‍यांनी अक्कलकोट नगरपालिकेतील २०१३-१४ या आर्थिक वर्षांच्या अहवालाची तपासणी केली़ यावेळी नगराध्यक्ष बसलिंगप्पा खेडगी, प्रांताधिकारी श्रीमंत पाटोळे, विरोध पक्षनेता अशपाक बळोरगी, मुख्याधिकारी एऩ के़ पाटील, नगरसेवक यशवंत धोंगडे, कार्यालयीन निरीक्षक रणजित कांबळे, मुख्य लिपिक कलप्पा मोरे उपस्थित होते़ शहरातील पाणीपट्टी, घरपट्टी वसुली कमी असल्याचे सांगून डॉ़ प्रवीण गेडाम म्हणाले, त्यात वाढ करा़ बोगस नळ कनेक्शन शोधून ते बंद करा आणि सुजल निर्मल पाणीपुरवठा योजनेमधून मीटर बसविण्यास सांगितले़ जून अखेरपर्यंत पाणीपुरवठा, लेखा, संगणक या विभागातील तांत्रिक कर्मचारी देण्याची ग्वाही त्यांनी दिली़ नव्याने आलेल्या कर्मचार्‍यांमार्फतच कामे करून घ्या़ त्याशिवाय त्या विभागाचे प्रश्न सुटणे अशक्य आहे़ तसेच आरोग्य विभागाचे कामही प्रशिक्षित कर्मचार्‍यांकडून करून घेणे आवश्यक आहे़ सफाई कर्मचार्‍यांनी गल्लो-गल्ली जाऊन कचरा संकलन करावे, असे डॉ़ गेडाम यांनी सांगितले़ बाजार कर, गाळे भाडे, पार्किंग फी या माध्यमातून उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्याच्या सूचना देऊन ते म्हणाले, कुरनूर येथून राबविण्यात आलेली सुजल-निर्मल पाणीपुरवठा योजना त्वरित चालू करून पाणीटंचाई दूर करावी़ तसेच सुवर्णजयंती योजनेच्या माध्यमातून गरजूंना प्राधान्य देऊन तत्काळ प्रकरणे मंजूर करा़ त्यासाठी संबंधित बँकांनाही पत्रव्यवहार करण्यास सांगितले़ तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अनुसूचित जाती नवबौद्ध घरकूल लाभार्थींनी भेट घेऊन त्यांची व्यथा मांडली़ जिल्हाधिकार्‍यांनी कागदपत्रे तपासून तत्काळ हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले़ तसेच शेतकरी संघटनेचे स्वामीनाथ हरवाळकर यांनी बोरगाव दे़ येथील गारपीटग्रस्त शेतकर्‍यांवर दाखल केलेले गुन्हे माघार घेण्याबाबत निवेदन दिले़ शिवसेना तालुकाप्रमुख मनोज पवार यांनीही दोन वर्षापूर्वी झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशीबाबत निवेदन दिले़ (प्रतिनिधी)

-------------------------------------------------

नियमानुसार गाळेभाडे ४नगरपालिकेच्या मालकीचे ३११ व्यापारी गाळे असून गेल्या अनेक वर्षांपासून तेथील व्यापारी ठाण मांडून आहेत़ शासन नियमानुसार ९ वर्षांपेक्षा अधिक काळ देता येत नाही़ नवीन पद्धतीने भाडे आकारा़ डिपॉझिट घेण्यासही जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले़ वादग्रस्त अतिक्रमण कायद्याने काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले़