शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
2
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
3
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
4
"घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गंमतीदार किस्सा
5
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
6
‘लाडकी बहीण’ योजनेत पुन्हा गैरप्रकार समोर; ६ लाडक्या भावांचे अर्ज, ‘असा’ लागला शोध
7
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
8
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
9
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
10
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
11
इटलीच्या PM मेलोनी यांना डेट करताहेत इलॉन मस्क? चर्चांना उधाण, स्पष्टीकरण देत म्हणाले...  
12
क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली
13
“ब्रिजभूषण सिंहचा एन्काउंटर का केला नाही, RSSच्या लोकांना वाचवायला अक्षय शिंदेला संपवले”
14
'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण
15
तिरुपती बालाजी मंदिर लाडू वादावर असदुद्दीन ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात मोठी कारवाई! टीटीडीकडून 'या' डेअरीच्या विरोधात तक्रार दाखल
17
सत्ता आल्यावर कसा निवडला जाणार मविआचा मुख्यमंत्री? पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला फॉर्म्युला 
18
Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?
19
Video - "मी ऑनलाइन गेममध्ये १५ लाख गमावले, मला ५००-५०० रुपयांची मदत करा"
20
Swiggyचा आयपीओ येण्यापूर्वी राहुल द्रविड पासून करन जोहर पर्यंत दिग्गजांच्या उड्या, पाहा डिटेल्स

अक्कलकोट-सोलापूर महामार्ग बंद पाडला; रस्त्यावर टायर जाळल्याने अग्नीचे तांडव

By appasaheb.patil | Published: October 30, 2023 7:50 PM

सोलापूर : आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा समाजाने आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाने आता उग्र रूप धारण केले ...

सोलापूर : आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा समाजाने आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाने आता उग्र रूप धारण केले असून सोमवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास सोलापूर-अक्कलकोट रोडवरील मल्लिकार्जुन नगर परिसरात राष्ट्रीय छावा संघटनेने रस्त्यावर टायर पेटवून शासनाचे लक्ष वेधले.

दरम्यान, एक मराठा...लाख मराठा...आरक्षण आमच्या हक्काचं..नाही कोणाच्या बापाचं..अशा एकापेक्षा घोषणांनी अक्कलकोट रोड दणाणून गेला होता. अचानक झालेल्या आंदोलनामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आंदोलकांना ताब्यात घेत रस्त्यावरील जळते टायर बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. अर्धा तासभर वाहतूक खोळंबली होती, वाहनांच्या अर्धा ते एक किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या.

दरम्यान, सोमवारी सकाळपासून आरक्षणाच्या मागणीसाठी विविध ठिकाणी आमरण उपोषण, सामूहिक मुंडण, तिरडी मोर्चा, उपोषण व गावबंदीचा ज्वर गावोगावी पसरला आहे. गावागावांत रात्रंदिवस मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी वेगवेगळी आंदोलने सुरू झाली आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरMaratha Reservationमराठा आरक्षण