अक्कलकोट : लिंग गुणोत्तर प्रमाणात जिल्ह्यात अक्कलकोट तालुक्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. यानिमित्त बालविकास प्रकल्प अधिकारी बालाजी अल्लवाढ यांचा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १८९व्या जयंतीनिमित्त महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात हा कार्यक्रम पार पडला. मागील काही वर्षात मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण खूप कमी होते. यावर्षी त्यात सुधारणा झाली आहे. एका पाहणीत अक्कलकोट तालुका एक हजार पुरुषामागे तब्बल ९६३ स्रियांचे प्रमाण आढळून आले आहे. यामुळे अल्लडवाढ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सहायक बालविकास अधिकारी शीतल बुलबुले, विस्तार अधिकारी मृणाली शिंदे, अंजली कुलकर्णी, शुभदा जेऊरकर, सुषमा नुले, भाग्यश्री कुलकर्णी, वंदना क्षीरसागर, पर्यवेक्षक कोळी उपस्थित होते.
यावेळी डॉ. माधवी पाटील यांचे व्याख्यान झाले.
---
फोटो : ०३ अक्कलकोट
बालविकास प्रकल्प अधिकारी बालाजी अल्लडवाढ यांचा सत्कार करताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी.