तत्पूर्वी या स्पर्धेचे उद्घाटन या उद्योग समूहाचे चेअरमन दीपक कोठारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संचालक भरतकुमार सेठीया, सहाय्यक व्यवस्थापक चंद्रकांत भागवत, नरेश पाठक, सीताराम देऊसकर, निवृत्ती पवार, श्रीकांत सहस्त्रबुध्दे उपस्थित होते.
दिवस-रात्र घेतलेल्या अटीतटीच्या सामन्यात अकलूज पोलीस कॉलनी व्हॉलिबॉल संघाने प्रथम क्रमांकाचे ११ हजारांचे बक्षीस व सन्मानचिन्ह पटकाविले. द्वितीय क्रमांक उजनी भीमानगर व्हॉलिबॉल संघाने ७ हजार रुपये व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक ब्रिमा सागर व्हॉलिबॉल संघ नंबर १ ने मिळविला व तसेच बावडा व्हॉलिबॉल संघाने चौथा क्रमांक मिळविला.
विजयी संघांना ब्रिमा महाराष्ट्र डिस्टिलरीज लिमिटेडचे जनरल मॅनेजर दिनकर बेंबळकर, डे. मॅनेजर नरेश पाठक, डे. मॅनेजर जयंत आरगडे, सुरक्षा अधिकारी भागवत पारसे यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.
या स्पर्धेचे अंपायर पांडुरंग जाधव, रहीम तांबोळी, दादा पवार, साहेबराव चव्हाण यांनी काम केले. समालोचन अनंत कुलकर्णी श्रीपाद देऊसकर व नागनाथ वाघमारे यांनी केले. खेळाडूंना तातडीचे प्राथमिक उपचार देण्याकामी जगदीश अग्निहोत्री यांचे सहकार्य लाभले.
फोटो
०७श्रीपूर-क्रीडा
ओळी
श्रीपूर येथील ब्रिमा सागर कारखानास्थळावर आयोजित व्हाॅलिबॉल स्पर्धेतील विजेत्या अकलूज पोलीस कॉलनी संघास कारखान्याचे जनरल मॅनेजर दिनकर बेंबळकर व डे. मॅनेजर नरेश पाठक यांनी बक्षिस व सन्मानचिन्ह दिले.