अकलूज-माळेवाडी ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत व नातेपुते ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर व्हावे या मागणीसाठी तिन्ही गावचे नागरिक साखळी उपोषणास बसले असून, त्यांची भेट घेण्यासाठी माढा लोकसभा मतदारसंघाचे खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर आले होते.
याप्रसंगी उपसरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख,अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष मुख्तार कोरबु, सातारा जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष जयकुमार शिंदे,स्वराज्य पतसंस्थेचे चेअरमन अमरसिंह नाईक-निंबाळकर,फलटणचे नगरसेवक डॉ. प्रवीण आगवणे,माळशिरस तालुका भाजप महिला अध्यक्षा कल्पना कुलकर्णी,उपाध्यक्ष जयमाला देशमुख, माळशिरस तालुका भाजप अध्यक्ष बाजीराव काटकर,उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव,सरचिटणीस संदीप घाडगे,किसान मोर्चाचे अमित कुंभार,युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दिग्विजय माने पाटील,अकलूज ग्रा.पं.चे सदस्य गणेश वसेकर,संजय साठे, माजी सदस्य विशाल मोरे उपस्थित होते.
खा.नाईक-निंबाळकर म्हणाले,विजयदादा बांधकाम मंत्री असताना त्यांनी बारामतीच्या गल्ली-बोळांत रस्ते केले. आता त्याच बारामतीकरांनी राजकीय द्वेषापोटी नगरपरिषद व नगरपंचायतीची मंजुरी अडवून ठेवली आहे. या पवार कंपनीचे खायचे दात वेगळे आणी दाखवायचे दात वेगळे आहेत. माळशिरस तालुक्याचा विकास होऊ नये म्हणून राष्ट्रवादीची धडपड सुरू आहे; परंतु आम्ही भाजपवाले आहोत. माळशिरस तालुक्यातच काय पण सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी औषधालासुद्धा शिल्लक ठेवणार नाही. बारामतीकरांनी तुम्हाला आज २५ दिवस झाले रस्त्यावर बसविले आहे. लक्षात ठेवा येथून पुढे २५ वर्षे यांना सत्तेवर येऊ देऊ नका. कृष्णा भीमा स्थिरीकरणासाठी आम्ही आग्रही आहोत. राज्य सरकारने जर मागणी केली तर केंद्र सरकार निधीसाठी विशेष तरतूद करेल. पंढरपूर-लोणंद रेल्वेचे काम लवकरात लवकर सुरू होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे सांगितले.
160721\181-img-20210716-wa0015.jpg
अकलुज येथे उपोषणस्थळी बोलताना खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर,