पोलीस सूत्रांनुसार बार्शी शहरालगत असलेल्या बीआयटी कॉलेजवळील पेट्रोल पपंजवळून एम.एच. ४५ टी १९५० या पिकअपमधून वाहन चालक इर्शाद कमला नदाफ (२७, रा. अकलूज) व क्लिनर शाहीबाज कुरेशी हे दोघे बेकायदेशीरपणे जर्सी गाई दाटीवाटीत बसवून उस्मानाबाद येथील कतलखान्याकडे घेऊन जात होते. कोणाला सुगावा लागू नये म्हणून पाठीमागील बाजूस ताडपत्री बांधली होती. ही माहिती प्राणीमित्र धन्यकुमार पटवा याना समजली. त्यांनी तातडीने शहर पोलिसाना खबर दिली. हवालदार माळी व ढोणे यांच्या सोबत जाऊन पहाणी करताना बळजबरीने या गाई बांधून नेल्या जात होत्या. त्यास पोलिसानी थांबवून पहाणी करताना एक जर्सी गाय जागीच मयत झालेली दिसली. त्यांच्याजवळ वाहतुकीची परवानगी व खरेदी केलेली पावती आढळली नाही. शिवाय ही जनावरे उस्मानाबादच्या कुरेशी यांच्या कतलखन्याकडे जात असल्याचे सांगण्यात आले. त्या दोघाना ताब्यात घेऊन चौघांवर गुन्हा दाखल केला.
चालकास पोलीस कोठडी
यातील अटक केलेला चालक इर्शाद नदाफ (२७) यास न्यायाधीश आर. एस. धडके यांच्यासमोर उभा करताच त्यास २६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली तर दुसरा आरोपी (वय १७) अल्पवयीन असल्याने त्यास नोटीस बजावून पालकांच्या ताब्यात देण्यात आले.