कोरोंनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात कडक नियमावली केली आहे. त्यामध्ये शनिवार व रविवार या दोन दिवशी अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने वगळून इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत. राज्याची आर्थिक अवस्था डबघाईला आलेली असताना राज्य शासनाच्या संमतीनंतर जिल्हा प्रशासनाने वाईन शॉप, बियर शॉपी, दारू दुकाने चालू करून ऑनलाइन घरपोच सेवा देण्याचे आदेश त्यावेळेस काढले होते. त्याचीच पुनरावृत्ती म्हणून दारू विक्रेते दुकानदार ग्राहकांना घरपोच सेवा देण्याचे काम करत आहेत.
---
कशी देतात घरपोच सेवा
माळशिरस तालुक्यामध्ये अकलूज, माळीनगर, श्रीपूर आदी परिसरामध्ये येथे शनिवार व रविवार लॉकडाऊन पडणार आहे हे समजताच दारू विक्रेत्यांनी प्रत्येक डिलिव्हरी बॉइजच्या घरी दारूचा मर्यादित साठा करून ठेवण्यात येतो. मागणीनुसार त्या त्या भागातील डिलिव्हरी बॉइजकडे दारू विक्रेते ऑर्डर करतात. त्यानुसार दारू व मावा घरपोच पोचतो. त्यासाठी जादा पैशाची सुद्धा आकारणी केली जाते.
----