सोलापूर : गुरूपौर्णिमेच्या संध्येला सोलापूर शहरातील बहुतांश नामवंत शिक्षण संस्थांचे मुख्याध्यापक आणि मुख्याध्यापिका लोकमतच्या सोहळ्यात एकत्र आले. प्रत्येक प्रयोगशील शाळेच्या उपक्रमातून शिक्षण क्षेत्रात नवा ‘सोलापूर पॅटर्न’ निर्माण करण्याचा विश्वासही यावेळी साºयांनी व्यक्त केला.
लोकमत बालविकास मंचच्यावतीने मंगळवारी (ता. १६) गांधी नगर येथील हेरिटेज लॉनमध्ये ‘माझी प्रयोगशील शाळा’ या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले. या कार्यक्रमात शिक्षणतज्ज्ञ जयंत नागराळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ब्रेन शैक्षणिक सल्ला व समुपदेशन केंद्राचे प्रा. किरण कुलकर्णी उपस्थित होते. चर्चासत्रात शहरातील विविध शाळांच्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी उत्स्फू र्त सहभाग घेतला. मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेमध्ये राबविण्यात येणाºया उपक्रमाची माहिती दिली.
कार्यक्रमात बोलताना जयंत नागराळे म्हणाले, वर्गामध्ये शिकविताना नेहमीच्या पद्धतीने न शिकविता विद्यार्थ्यांना व्हिज्युअलाईज करायला लावून एखादी संकल्पना स्पष्ट करायला हवी. त्यासाठी गाणे, नृत्य, अभिनय यांचाही आधार घेता येऊ शकतो. यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात ती संकल्पना चित्रपद्धतीने लक्षात राहते. विद्यार्थी परीक्षेच्या वेळी तसेच दैनंदिन जीवनात या संकल्पना प्रत्यक्षात उतरवू शकतात. आपल्याला कोणतीही गोष्ट दृक्श्राव्य (आॅडिओ-व्हिज्युअल) पद्धतीने दाखविल्यास ती लगेच समजते. अभिनय व गीत गाणे हे आधी शिक्षकाने शिकायला हवे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शनिवारी विद्यार्थ्यांना दप्तर आणायला न लावता त्या दिवशी आठवड्यात काय केलं, याची उजळणी करायला हवी.
कार्यक्रमाच्या शेवटच्या सत्रात शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठीचे नवे उपक्रम कसे राबविले, त्याला पालक व विद्यार्थ्यांचा कसा प्रतिसाद मिळाला, यावर चर्चा केली. यापुढेही नावीन्यपूर्ण शिक्षण देऊन विद्यार्थ्यांसाठी शिक्षण सोपे कसे करता येईल, यावर भर देण्याचा प्रयत्न करणार असल्याचा विश्वास त्यांनी बोलून दाखविला. दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी लोकमत बालविकास मंचतर्फे नोंदणी करण्यास सुरुवात झाली आहे. ज्या शाळेच्या विद्यार्थ्यांना नोंदणी करायची आहे त्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.
चेहºयावर हसू अन् पालकांशी मैत्री- नेहमीच्या पद्धतीपेक्षा वेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवायला लागल्यास काही पालकांना हे पटत नाही, ते तक्रार करतात. अशा पालकांना वैयक्तिकरित्या भेटून आधी त्यांची बाजू ऐकून घेणे गरजेचे आहे. आपण ज्या नव्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवित आहोत, हे त्याला समजावून सांगण्याआधी त्याच्याशी मैत्री करायला हवी. हे सांगताना आपल्या चेहºयावर हसू असल्यास त्यानंतर सगळ्या गोष्टी सोप्या होतात. आपण स्वत:ला शिक्षक किंवा मुख्याध्यापकाच्या भूमिकेपेक्षा पालक ाच्या भूमिकेतून संवाद साधल्यास त्यांच्या समस्या समजणे शक्य होते.
यांनी नोंदवला सहभाग- सचिन जाधव (सिद्रामप्पा हत्तुरे प्रशाला), आर. पी. सुरा (राज मेमोरिअल स्कूल), अनिल पाटील (अण्णाप्पा काडादी प्रशाला), पी. जी. चव्हाण (हरिभाई देवकरण प्रशाला), गीता सादूल (भू. म. पुल्ली), गायत्री कुलकर्णी (संगमेश्वर पब्लिक स्कूल), सुनीता चकोत (ज्ञान प्रबोधिनी प्रशाला), ए. आर. भोसले (निर्मलाताई ठोकळ प्रशाला), एस. एस. तडकासे (व्ही. एम. मेहता प्रशाला), मधुरा देशपांडे (व्ही. एम. मेहता प्रशाला), ए. पी. सय्यद (धर्मण्णा सादूल प्रशाला), यु. आर. पाटील (महावीर हायस्कूल), राजूला मॅक (शांती इंग्लिश मीडियम स्कूल), आशितोष शहा (जैन गुरुकुल प्रशाला), मुबीन मडकी (नवजीवन इंग्लिश स्कू ल), सरसंभे सर (भारत मराठी विद्यालय), अपर्णा कुलकर्णी (इंडियन मॉडेल स्कूल), अचला राचर्ला (इंडियन मॉडेल स्कूल, सीबीएसई), वनमोडे सर, राखी देशमाने (श्राविका प्राथमिक शाळा), स्वाती वनशेट्टी (कीड्स नर्सरी), समीर मळ्ळी सर (रोशन प्रशाला), अशोक मोहरे (सिद्धार्थ प्रशाला), युवराज मेटे (भू. म. पुल्ली), तुकाराम श्रीराम (कुचन प्रशाला), मल्लिकार्जुन जोकारे (कुचन प्रशाला), एल. आर. रणसुभे (राजेश कोठे स्कूल)