सोलापूर : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर ३१ मार्चपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व बाबी बंद राहणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढले आहेत. या आदेशान्वये खासगी आॅफिस आणि दुकाने बंद राहणार आहे. मात्र, यादरम्यान अत्यावश्यक सेवा म्हणजेच बँका, सार्वजनिक वाहतूक, बाजारपेठा, किराणा मालाचे दुकान, दुधाचे दुकान, रुग्णालये, छोटे रेस्टॉरंट सुरु राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
याशिवाय सोलापूर जिल्ह्यातील सोने-चांदीची दुकाने, कापड, अॅटोमोबाईल, भांड्याची दुकाने, इलेक्ट्रीक-इलेक्ट्रॉनिक्स, टिंबर, प्लायवूड व इतर दुकाने (जीवनाश्यक वस्तू, किराणा दुकान, औषधे, फळे, भाजी वगळून) २० मार्च रोजी सायंकाळी ६ ते ३१ मार्च २०२० रोजी रात्री १२ वाजेपर्यंत चालू ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे़ या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना यांच्याविरूध्द कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
याचबरोबर, 'रेल्वे आणि बस या आपल्या शहराच्या वाहिन्या आहेत. त्या बंद करणे सोपे आहे, पण त्या बंद केल्यानंतर अत्यावश्यक सेवा पुरवणाºयांवर परिणाम होईल. महापालिका कर्मचारी, डॉक्टर यांची ने-आण कशी होईल. तूर्त या दोन सेवा बंद न करता राज्यातील सर्व कर्मचाºयांची उपस्थितील २५ टक्क्यांवर आणली आहे. जीवनाश्यक वस्तू व्यक्तिरिक्त सर्व गोष्टी बंद. ही बंदी ३१ मार्चपर्यंत असेल' अशी माहिती जिल्हाधिकाºयांनी दिली. याशिवाय, पुढे आर्थिक संकट उद्भवेल, याचा मुकाबला कसा करायचा यावर उपाययोजना सुरु असल्याचेही जिल्हाधिकाºयांनी सांगितले़