सोलापूर : सोमवार ते शुक्रवारी सकाळी सात ते रात्री आठ पर्यंत बेकरी, दूध डेअरी, भाजीपाला, किराणा दुकाने, खाद्यपदार्थ, मेडिकल यासारखे अत्यावश्यक सेवा वगळता ग्रामीण भागात सर्व दुकाने ३० एप्रिल पर्यंत बंद राहतील.
तसेच शनिवारी-रविवारी पूर्णता बंद राहील. उर्वरित कालावधीमध्ये सोमवार ते शुक्रवार रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत आणि पुढे शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ पर्यंत कोणत्याही व्यक्तीस कोणत्याही वैद्य करण्याशिवाय किंवा परवानगीशिवाय संचार करण्यास बंदी राहील.
या काळात उद्योगांना मुभा देण्यात आली आहे. उद्योजकांना कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी करून उद्योग सुरू ठेवता येईल, असे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोमवारी रात्री काढले आहे.