सोलापूर : सोलापुरातील होटगी रोड विमानतळावरूनविमानसेवा करण्यासाठीच्या हालचाली वाढल्या आहेत. आता सोलापूर-हैदराबादसाठी अलायन्स एअर तर पुणे, मुंबई, तिरूपतीसाठी इंडिगो, गो फर्स्ट, फ्लाय बिग, स्टार एअर, अलायन्स एअर, स्पाइस जेट, आकासा एअर, विस्तारा या कंपन्या सरसावल्या असल्याची माहिती सोलापूर विचार मंचच्या पदाधिकार्यांनी दिली.
विमान सेवेस अडथळा ठरणारी सिद्धेश्वर ची अनधिकृत चिमणी पाडली. त्यानंतर सोलापूर विचार मंच तर्फे एअरपोर्ट अथोरिटी ऑफ इंडिया, सोलापूर यांची भेट घेऊन डीजीसीए, एअरपोर्ट अथोरिटी व नागरी उड्डाण मंत्रालयास सोलापुरातून तातडीने मुंबई, हैदराबाद, बेंगलोर,नवी दिल्ली, चेन्नई व तिरुपती या ठिकाणी उडान योजनेअंतर्गत विमानसेवा सुरू करण्याबाबत पत्रव्यवहार केला होता. त्यास तत्परतेने आरसीएस- उडान योजनेचे सरव्यवस्थापक अतुल्य अग्रवाल यांनी मेल पाठवून डीजीसीकडून सोलापूर विमानतळास लायसन्स मिळताच सोलापूर ते हैदराबाद ७२ सीटर एटीआर विमानसेवा अलायन्स एअर ही कंपनी देऊ शकते. तसेच इतर ठिकाणांसाठी बाकी कंपन्या आपले प्रस्ताव पाठवतील असे सांगितल्याची माहिती डॉ. संदीप आडके यांनी दिली.