शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
3
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
4
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
6
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
7
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
8
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
9
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
10
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
11
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
12
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
13
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
14
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
15
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
17
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
18
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
19
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
20
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!

ठाकुरबुवांच्या समाधी जवळ रिंगणाबरोबरच उडीच्या खेळाने वातावरण भक्तीच्या शिखरावर

By admin | Published: July 01, 2017 11:55 AM

आॅनलाइन लोकमत सोलापूर

आॅनलाइन लोकमत सोलापूरउघडेवाडी : शहाजी फुरडे-पाटीलआषाढी एकादशी सोहळ्यासाठी आळंदी हुन निघालेल्या संत ज्ञानेश्वर माऊलीचा पालखी सोहळा अर्धनारी नटेश्वर नगरी वेळापूर चा मुक्काम संपवून भडीशेगाव कडे मार्गस्थ होत असताना वाटेत उघडेवाडी येथील ठाकुरबुवांच्या समाधी जवळ गोल रिंगणाच्या आनंदा बरोबरच दिंद्यदिंड्यातील वारकऱ्यांनी, उडीचा खेळ खेळून आनंद घेतला. यावेळी अश्वाचा रिंगण सोहळा पार पडल्यानंतर विणेकरी, तुळसधारी महिला, व पखवाज वादक यांनीही धावून रिंगण पूर्ण केले. उडीच्या खेळात टाळ मृदंगाच्या गजराने वातावरण भक्तीच्या परमोच्च शिखरावर पोहचले होते.माऊली सकाळी साडे सहा वाजता मार्गस्थ झाली बरोबर साडे आठ वाजता सोहळा उघडेवाडी येथे पोहचला. आखून ठेवलेल्या रिंगणात एकामागून एक दिंड्या येत होत्या.पालखी आत आल्यावर एक प्रदक्षिणा पूर्ण केली. व मंडपात विसावली. प्रत्येक दिंड्यातील झेंडेकरी पालखीच्या कडेला उभे राहिले होते.त्यानंतर राजाभाऊ चोपदार, रामभाऊ व बाळासाहेब चोपदार यांनी रिंगणाची पाहणी केली. तोपर्यंत दोन्ही अश्व मैदानात येऊन थांबले होते. दोन्ही अश्वानी जोरात धावत एक रिंगण पूर्ण केले.आणि मैदानात दिंड्या-दिंड्यात विठू नामाचा व माऊली तुकोबांचा जयघोष व विविध प्रकारचे खेळ सुरू झाले, कांही दिंड्यातील महिलांनी फेर धरून गवळणी गाण्यास सुरुवात केली.पुन्हा मैदानात माउलींच्या पालखीच्या कडेने सर्व विणेकरी,पखवाज वादक, तुळस धारी महिला यांनी एक रिंगण पूर्ण केले, तर टाळकरी जमिनीवर झोपून भजनात तल्लीन होऊन टाळ वाजवत होते, त्यांना राजाभाऊ चोपदार हातवारे करून प्रोत्साहन देत होते. त्यामुळे सर्व मैदानात माउलीमय वातावरण तयार झाले होते. त्याठिकाणी वारक?्यांनी न्हयाहरी ही केली. रिंगण व उडीच्या खेळाचा आनंदाने प्रफुल्लित होऊन वारकरी संत सोपान काका व माऊलींच्या भेटी चा क्षण डोळ्यात साठवून ठेवण्याचा ओढीने हिरव्यागार उसाच्या शेतातील रस्त्यामधून तोंडले-बोंडले येथे दुपारच्या विश्रांती साठी थांबला. रात्री पालखी पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव येथे मुक्काम करणार आहे.