कुसळंब : बार्शी तालुक्यातील आगळगाव येथे पाठक डीपीवरील एलटी लाइनच्या २२ पोलवरील ६६ हजारांच्या ॲल्युमिनियम तारा लंपास करून सोळा सिमेंटच्या पोल मोडून तोडून ४० हजारांचे नुकसान केले.
याबाबत अनंत पंडित मोहिते यांनी फिर्याद दिली आहे. ११ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता कळमवाडी येथून आगळगावकडे जात असताना पाठक डीपीवरील काही पोल पडलेले दिसले. जवळ जाऊन पाहिले असता पाठक डीपीवरून नागनाथ उकिरडे यांच्या शेताकडे जाणारा एलटी इनच्या एकूण आठ गाळ्यांतील ॲल्युमिनियमच्या तारा व तुकाराम वागळे, प्रकाश ठोंबरे यांच्याकडे जाणाऱ्या २० एलटी लाइन गाळ्यांपैकी १४ तारा गायब होत्या. डीपीचे एकूण सोळा पोल तुटून खाली पडून नुकसान झाल्याचे दिसले. याबाबत वरिष्ठ अधिकारी महेश भगवान झिंगाडे यांना याची माहिती दिली असता त्यांनी घटनास्थळी पाहणी केली. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र मंगरुळे हे करीत आहेत.