अनिल भीमराव कदम (वय ४१, रा. महूद, ता. सांगोला) असे मृताचे नाव आहे. तर वर्षा भीमराव कदम व रुग्णवाहिकेचा चालक या दोन जखमींचा समावेश आहे.
महूद येथील अनिल कदम याला दोन महिन्यांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. त्यामुळे तो घरीच उपचार घेत होता. मंगळवारी अचानक त्याचा श्वासोश्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने बहीण वर्षा कदम हिने पंढरपूर येथील विठ्ठल हॉस्पिटलची रुग्णवाहिका मागवून घेतली.
महूदहून दुपारी ३.३०च्या सुमारास वर्षा कदम या भाऊ अनिल कदम यास तपासणीसाठी पंढरपूरला घेऊन निघाल्या. दरम्यान, भरधाव रुग्णवाहिकेवरील चालकाचा गादेगाव (पंढरपूर) फाट्यानजीक ताबा सुटल्याने रुग्णवाहिका रस्त्याच्या कडेला खड्ड्यात पलटी झाली. अपघातात अनिल कदम याच्या डोक्याला गंभीर मार लागून जागीच ठार झाला. तर बहीण वर्षा कदम व चालक दोघेही गंभीर जखमी झाले होते.
----
नागरिकांनी हलवले रुण्णालयात
अपघातस्थळी नागरिकांनी धाव घेऊन मृत व जखमींना अपघातग्रस्त रुग्णवाहिकेतून बाहेर काढले. त्यांना उपचारासाठी पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिले. याबाबत सिस्टर उडानशिवे यांनी पोलिसात खबर दिली.