याबाबत अधिक माहिती अशी की, आदलिंगे यांना क्रेडिट कार्ड बंद करायचे होते. यामुळे त्यांनी खासगी बँकेत अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता बँकेतील अधिकाऱ्यांनी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ही सेवा बंद करता येईल असे सांगितले. दरम्यान, त्यांना एका अनोळखी व्यक्तीने फोन करून तुम्हाला क्रेडिट कार्ड सेवा बंद करायचे असल्यास तुमच्या मोबाईलवर आलेले ओटीपी नंबर सांगा, असे म्हणून एकदा ७० हजार आणि ८० हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर अनेक दिवसांनी फसवणूक झाल्याचे आदलिंगे यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी याबाबत सायबर शाखेला माहिती दिली. सायबर शाखेच्या पाठपुराव्यानंतर आदलिंगे यांच्या खात्यावर १ लाख ४६ हजार रुपये परत मिळाले. यामुळे सायबर शाखेच्या वतीने कोणालाही ओटीपी नंबर न सांगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही कामगिरी सायबर शाखेचे पोलीस उपनिरीक्षक बायस, पोसई होटकर, वसीम शेख व अमोल कानडे यांनी केली.
सायबर पोलिसांच्या प्रयत्नांमुळे मिळाली दीड लाखाची रक्कम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2020 4:48 AM