- संजय बोकफोडे
सोलापूर - बार्शी तालुक्यातील गाडेगाव येथील वृद्ध महिला पाणी तापवण्यासाठी चुल पेटविली. वारे असल्यामुळे चुलीची ठिणगी खोपटीला लागून आगीत दोन वृद्ध पती-पत्नी जागीच मयत झाल्याची घटना १३ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेत भीमराव काशीराम पवार (९५) कमल भीमराव पवार (९०) दोघेही राहणार गाडेगाव (ता बार्शी) हे दोघे जागीच मयत झाले आहेत.
त्यातील मिळालेली माहिती अशी की १३ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास चुलीवर पाणी ठेवण्यासाठी कमलबाई उठून चुल पेटवून पाणी ठेवले व त्यांच्या जवळील नातू प्रथमेश यास म्हैस सुटल्यामुळे बांधण्यासाठी उठवले. म्हैस बांधत असताना खोपटास आग लागली. दोघांनी विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु आगीने उग्ररूप धारण केले, त्यावेळी पत्नी कमलबाई आपला पती आत झोपलेला असल्यामुळे त्याला उठवण्यासाठी गेले असता दोघेही जागीच मृत पावल्याची घटना घडली आहे.
माहिती मिळतात सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल गोरख भोसले, सर्जेराव गायकवाड, राजेंद्र मंगरूळ, आप्पासाहेब लोहार, महेश डोंगरे व इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.