सोलापूर/मंगळवेढा : दीपावली सणातील पाडवा व भाऊबीज हे दोन महत्वाचे सण एकत्रित येण्याचा योग तब्बल दहा वर्षांनी आला आहे या दिवशी बहिणीने भावाला ओवळण्याची प्रथा आहे त्यानुसार मंगळवेढा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात हा भाऊबीज सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा हे नाव आहे या दिवशी बळीपूजा करण्याची प्रथा आहे. या दिवसापासून विक्रम सवंत सुरू होतो. म्हणून याला दिवाळी पाडवा म्हणतात हिंदूच्या मुहुर्तांपैकी अर्धा मुहुर्त म्हणून हा दिवाळीचा मुख्य दिवस म्हणतात. या दिवशी पत्नीने पतीला लावण्याची पद्धत आहे तर सोमवारीच कार्तिक शुद्ध द्वितीया असल्याने भाऊबीज देखील होणार आहे.
या दिवशी यम हा त्यांच्या बहिणीकडे जाऊन ओवाळून घेतो, अशी श्रद्धा असून या दिवशी अपमृत्यू पडत नाहीत असे मानले जाते त्यामुळे हिंदू संस्कृतीत भाऊबीजेच्या दिवशी भावाने बहिणीकडे जावे आणि बहिणीने भावाला ओवाळण्याची परंपरा आहे भावाने बहिणीच्या घरी जाताना तिला वस्त्रालंकार वगैरे देऊन तिच्या घरी भोजन करण्याची प्रथा आहे सख्खी बहीण नसेल तर कोणत्याही बहिणीकडे जावे अशी पद्धत आहे, त्यामुळे बहीण-भावाच्या प्रेमाची देवाणघेवाण होऊन एकमेकांविषयी कृतज्ञताभाव जागृत होण्यासाठी होण्यासाठी भाऊ बहीण भाऊबीज साजरी करतात त्यामुळे सोमवारी दिवसभर भाऊबीज सण मोठ्या आनंदात साजरा झाला.