शीतलकुमार कांबळेसोलापूर : आपल्या विविध मागण्यासाठी अंगणवाडी सेविकांनी बेमुदत संप पुकारला आहे. संपाच्या दुसऱ्या दिवशी अंगणवाडी ताईंनी लाटणे दाखवत आंदोलन केले. यावेळी अंगणवाडी सेविकांनी काळे झेंडे दाखवत शासनाच्या विरोधात घोषणा दिल्या.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेचा दर्जा द्यावा, मानधन वाढ करा यासह विविध मागण्यांसाठी राज्यात अंगणवाडी सेविकांनी आंदोलन पुकारले आहे. प्रलंबित मागण्यांसाठी प्रशासनाला पूर्व सूचना देत सोलापूर शहर-जिल्ह्यातील नऊ हजार अंगणवाडी सेविका मदतनीस बेमुदत संप सुरू केला आहे. अंगणवाडी सेविकांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय संप मिटणार नाही. शासनाने अंगणवाडीताईंचे मागण्या या मान्यच केल्याच पाहिले. अन्यथा आंदोलन आणखी तीव्र प्रकारचे करण्यात येणार येईल, अशा इशारा अंगणवाडी सेविकांनी यावेळी दिला.सुट्टीच्या दिवशी पाठविला आहारमहिला कर्मचाऱ्यांवर दबाव निर्माण करण्यासाठी सार्वजनिक सुट्टीच्या तोंडावर प्रशासनाने पोषण आहार पाठविला आहे. नियमानुसार पोषण आहार एक ते दहा तारखेच्या दरम्यान पाठवणे अपेक्षित आहे. मात्र, अंगणवाडी सेविकांचे संप मागे घ्यावा, यासाठी प्रशासनाकडून विविध प्रकार प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र अंगणवाडी सेविकांचा मागण्या मान्य झाल्याशिवाय संप मिटणार नसल्याचे अंगणवाडी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांनी सांगितले.