मंगळवेढा येथे महिला हॉस्पिटल अँड मल्टीस्पेशालिटी व माजी सैनिक संघटनेतर्फे घेतलेल्या आरोग्य शिबिरात ३७८ रुग्णांची मोफत तपासणी केल्याची माहिती हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. पुष्पांजली शिंदे यांनी दिली. उद्घाटन येड्राव येथील सुपुत्र शहीद किसन माने यांच्या वीरपत्नी शामल माने यांच्या हस्ते धन्वंतरी पूजनाने झाले. शिबिरात डॉ. अविनाश सुरवसे, डॉ. विशाल फडे, डॉ. अरविंद गिराम, डॉ. अनिल केसकर, डॉ. अमित गुंडेवार, डॉ. महेश कोनळ्ळी, डॉ. दत्तात्रय घोडके, डॉ. स्नेहा सुरवसे-माकणीकर, डॉ. पुष्पांजली शिंदे यांनी सेवा बजावली. डॉ. राहुल शेजाळ यांनी शिबिराचे समन्वयक म्हणून काम पाहिले.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नंदकुमार शिंदे, डॉ.सदानंद माने, डॉ. सतीश डोके, दशरथ फरकंडे, माजी सैनिक तालुकाध्यक्ष मेजर मल्लय्या स्वामी, सचिव चंगेजखान इनामदार, उपाध्यक्ष मुबारक मुलाणी, कृष्णनाथ लिगाडे, महादेव दिवसे, दयानंद गायकवाड, मच्छिंद्र कोळेकर, भारत शिंदे, किसन पडवळे, शंकर जाधव, प्रकाश लिगाडे, मुरलीधर घुले, मल्लिकार्जुन माळी, चोखामेळा नगरच्या उपसरपंच अनिता कदम आदी उपस्थित होते.
या विकारांवर झाले उपचार
मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनी, हृदयविकार, कावीळ, स्वादूपिंड, पित्तविकार, फिट, झटके, दमा, ॲलर्जी, जुनाट सर्दी व खोकला, क्षयरोग, फुफ्फुस, गर्भाशय पिशवी, मानेवरील व पोटातील टीबीच्या गाठी, मणका व मेंदूचा टीबी, न्यूमोनिया, श्वसनविकार, झोपेचे विकार, घोरणे, झोपेत श्वास बंद होणे, अंतरकोशिय फुफ्फुसविकार, हर्नीया, हायड्रोसिल, अपेंडिक्स, पोटातील गाठी, स्तनाच्या गाठी, सांधेदुखी, कंबरदुखी, मणक्याचे विकार, गुडघेदुखी, न्यूमोनिया, बालदमा, लहान मुलांची कावीळ, झटके येणे, बालकांचे हृदयविकार, मेंदू विकार, कोरोना चाचणीसह सर्व आजारांची तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आली.
फोटो ओळी :::::::::::::::
मंगळवेढा येथे महिला हॉस्पिटल अँड मल्टीस्पेशालिटीतर्फे घेतलेल्या शिबिरात रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.
180821\053620210815_112311.jpg
फोटो ओळी-मंगळवेढा येथे महिला हॉस्पिटलमध्ये मोफत तपासणी शिबिरात ३७८ रुग्णांची तपासणी करण्यात आली