सोलापूर : उमा नगरी येथे प्लास्टिकच्या डब्याच डोके अडकलेले श्वान सैरावैरा धावत होते. श्वानाच्या तोंडातून डबा काढून त्याची मुक्तता करण्यात आली. नेचर कॉन्झर्व्हेशन सर्कलच्या प्राणिमित्रांनी कामगिरी केली.
एका मोकाट श्वानाचे डोके प्लास्टिक डब्या अडकल्यामुळे त्याला श्वास घ्यायला अडचणी येत होत्या. या त्रासदायक परिस्थितीत तो श्वान सैरावैरा धावत होते. त्याच्यामागे त्या परिसरातील इतर मोकाट श्वान भुंकत त्याला तेथून पळवून लावत होते. ही बाब संदीप नरळे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी याची माहिती नेचर कॉन्झर्व्हेशन सर्कलच्या सदस्यांना दिली. काही वेळातच पाच ते सहा सदस्य त्याठिकाणी दाखल झाले. त्या श्वानाचा शोध घेऊन शिताफीने पकडून अडकलेल्या डब्यातून त्याची सुटका करण्यात आली.