भ. के. गव्हाणे
बार्शी : लॉकडाऊनच्या काळात मानवाच्या अन्नाचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर या भगवंत नगरीतील अनेक सामाजिक संस्थांनी पुढे येऊन त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली. पण जिथे मुक्या प्राण्यांच्या पोटाचे काय असा प्रश्न निर्माण झाला. अशावेळी मुक्या श्वानांच्या मदतीला बार्शीतील मुस्लीम समाजातील कार्यकर्ते देवदूत बनून धावून आले. शहरातील अशा मोकाट जनावरे आणि श्वानांना शोधून ते त्यांच्या खाण्या-पिण्याची सोय करीत आहेत.
आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून सोमवार पेठेतील फळाचे व्यापारी युन्नूसभाई शेख आणि त्यांचा मित्रपरिवार श्वानप्रेमीसाठी धावून आला आहे. युन्नूसभाई सोमवार पेठेतील फळाचे व्यापारी आहेत. कोरोनाच्या महामारीत अनेक भल्याभल्याची दमछाक होत आहे. चाकरमानी वगळता मजूर वर्गावर रोजगाराअभावी उपासमारीची वेळ आली आहे.
माणूस भूक लागल्यास जेवण मागून घेतो पण रस्त्यावरील मोकाट श्वानास बोलता येत नसल्याने त्यांची काय अवस्था असेल याची कल्पनाही करवत नाही. यांच्या या भावना लक्षात घेऊनच जो काम करतो तोच खरा माणूस अशाच्या मदतीला धावलेले बार्शीचे युन्नूसभाई शेख यांनी स्वखर्चाने चपाती, भाकरी याबरोबरच बिस्कीट, ब्रेड सकाळ, संध्याकाळ काही जनावरांबरोबर मोकाट श्वानास पोटभर देऊन पाणीही पाजताहेत.युन्नूसभाई शेख यांची उडान फाउंडेशन ही संस्था असून या मुक्या प्राण्याबरोबरच लॉकडाऊनच्या काळात गरजूंना गहू, तांदूळ, साखर, मीठ, शेंगदाणे, साबण, दाळ, तेल याचे कीट स्वत: जाऊन वाटप करत आहेत.
लॉकडाऊन संपेपर्यंत सेवा सुरु ठेवणारलॉकडाऊन असेपर्यंत हा उपक्रम सुरु ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. या सामाजिक कामासाठी या नगरीतील माणसाबरोबरच सोबत त्यांची मुलगी बेबीआयशा राजूभाई शिकलकर, शोएब काझी, मोहसीन नगर, उडान फाउंडेशनचे अध्यक्ष इरफानभाई घातक, उपाध्यक्ष इलियासभाई जालनेवाले हे साथ देत आहेत. ही मंडळी शहरातील विविध भागात सकाळ-संध्याकाळी जाऊन जवळजवळ दररोज ५० श्वानाच्या खाण्याची व्यवस्था करत आहेत. जगण्याचा अधिकार सर्वांना आहे. शहरातील श्वानांच्या खाण्याचा प्रश्न मात्र या पे्रमींनी सोडविला. या कार्यात हे विशेष सहकार्य करून भटक्या श्वानांना जेवण देण्याचे काम करत आहेत.