वडशिंगे (जि. सोलापूर) : कांद्याचे दर गडगडले आहेत. बाजारात भाव नाही. शेतकऱ्यांची व्यापाºयाकडे पत नाही. शेतात माल असूनही हातात पैसा येईलच याचा भरवसा नाही. अशा अवस्थेत माढा तालुक्यातील लोंढेवाडी येथील वैफल्यग्रस्त शेतकºयांनी आपल्या शेतातील उभ्या कांद्याच्या पिकात जनावरे सोडली आहेत. तर काही शेतकºयांनी कांद्याच्या पिकावर नांगर चालवून कांदा न काढणेच पसंत केले आहे.यंदा पीक हाती लागेल यासाठी कांदा पिकवला, पण या कांद्याने चार पैसे हाती लागायचे सोडून कर्जबाजारी होण्याची वेळ शेतकºयांवर आल्याचे चित्र आहे. लोंढेवाडी येथील भारत गजेंद्र मोरे यांनी स्प्रिंकलरद्वारे सव्वा एकर कांद्याची लागवड केली होती. त्यासाठी पंचवीस हजार रुपये खर्च तसेच बियाणे व लागवडीसाठीआठ हजार पाचशे व खुरपणीसाठी पंधरा हजार रुपये तसेच रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औषधासाठी दहा हजार रुपये खर्च केला. मेहनतीमधून अंदाजे अडीच क्विंटल पर्यंत कांद्याचे उत्पादन पिकविले. मात्र कोसळलेला कांद्याचा दर पाहता कांदा काढणे परवडण्यासारखे नाही. त्यामुळे त्यांनी उभ्या पिकात जनावरे सोडून दिली.येथीलच बिंन्टू दत्तात्रेय लोंढे यांनी ड्रीपद्वारे दोन एकर क्षेत्रामध्ये कांद्याची लागवड केली. त्यासाठी त्यांनी बियाणे व लागवड फवारणी खुरपणी यासाठी साठ हजार रुपयांपर्यंत खर्च केला. कांद्याला भाव गडगडल्याने त्यांनीदेखील शेतात जनावरे सोडली.
कांद्याच्या उभ्या पिकात सोडली जनावरे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 6:07 AM