एनसीसी नॅशनल निदेशालयाने महाराष्ट्र, केरळ व लक्षदीप एनसीसी निदेशालय यांच्या संयुक्तपणे या कॅम्पचे आयोजन केले होते. हे कॅम्प १६ ते २१ एप्रिल दरम्यान पार पडला. या कॅम्पमध्ये एकूण ३६५ विद्यार्थी सहभागी झाले होते. महाराष्ट्रातील सर्व बटालियन मधून विद्यार्थी सहभागी झाले होते. या कॅम्पमध्ये राज्यांचा इतिहास, भूगोल, संस्कृती, वारसा, सणवार, भाषा, लिडरची ओळख यांची देवाण-घेवाण झाली. कॅडेटनी चित्र दृश्य प्रणाली (पीपीटी) द्वारे आपआपल्या राज्यांचा आभास निर्माण करून या राज्यांना भेट दिल्याची जाणीव निर्माण करून दिली. तसेच बॅन ऑन सिंगल यूज प्लास्टिक ॲण्ड फिट इंडिया मुहमेंट सारख्या विषयांवर वैचारिक चर्चा घडवून आणली. वेगवेगळ्या विषयात झालेल्या वाद-विवाद स्पर्धेमध्ये सहभागी कॅडेट पैकी अनिशा नंदीमठ हिला राष्ट्रीय निदेशालयाने द्वितीय क्रमांकाने निवडले.
या कॅम्पची सर्व जबाबदारी ९ महाराष्ट्र बटालियन सोलापूर यांनी स्वीकारली होती. यामध्ये कमांडिंग ऑफिसर कर्नल प्रशांत नायर आणि एओ कर्नल एस. के. चव्हाण यांनी हा कॅम्प यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. ग्रुप कमांडर ब्रिगेडियर सुनील लिमये यांनी मार्गदर्शन केले. तिचे बार्शी शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन प्रभाताई झाडबुके, संचालिका वर्षाताई झाडबुके, डॉ. एच. एस. पाटील यांनीही कौतुक केले आहे.
२४अनिशा नंदीमठ