अंजनगाव खेलोबा येथील ग्रामपंचायतीने आरोग्य विभागाकडे पाठपुरावा करून गावातील वयोवृद्धांसाठी गावात शिबिर घेण्याची विनंती केली. त्यानुसार हे शिबिर पार पडले. शिबिरात येताना सर्व नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन केले.
याप्रसंगी सरपंच आप्पाराव वाघमोडे, उपसरपंच भागवत चौगुले, ग्रामसेवक भाऊसाहेब कदम, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप चौगुले, प्रशांत चौगुले, धनाजी पाटेक, रामचंद्र चौगुले, रत्नप्रभा इंगळे, पुष्पा चौगुले, महादेव चौगुले, पांडुरंग चौगुले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. या शिबिरात डॉ. आर. एच. मुल्ला,
डॉ. बालासाहेब चाटे, डॉ. किशोर गुंड, सुरेखा बगाडे, माधुरी पोळ, बी. बी. चवरे, कांचन चौगुले, अंजली सुतार, सरस्वती भंडारे या आरोग्य कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. नाव नोंदणीसाठी कॉम्प्युटर ऑपरेटर दिलीप वाघमोडे यांनी काम पाहिले.
फोटो
२६माढा०१
अंजनगाव येथे आयोजित शिबिरात नागरिकांचे लसीकरण करताना आरोग्य कर्मचारी. त्याप्रसंगी सरपंच आप्पाराव वाघमोडे, उपसरपंच भागवत चौगुले, ग्रामसेवक भाऊसाहेब कदम यांच्यासह ग्रामस्थ.