चपळगाव : स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट), अक्कलकोट या न्यासाचा यंदाचा ३४ वा वर्धापनदिन आणि श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त होणारे धर्मसंकीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम हे कोरोना राष्ट्रीय आपत्तीमुळे रद्द करण्यात आल्याची माहिती न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांनी दिली आहे.
गुरुपौर्णिमा उत्सव काळातील दहा दिवसांचे धर्मसंकीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रम पूर्णपणे रद्द करून २३ जुलै रोजी होणारा ३४ वा वर्धापनदिन व गुरुपौर्णिमा उत्सव साधेपणाने साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गुरुपौर्णिमा दिवशी श्रींची नित्योपचार पूजा व महानैवेद्य अर्पण करण्यात येणार आहे. न्यासाच्या वतीने गेल्या २१ वर्षांपासून धर्मसंकीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांनी दिली.
---
फोटो : १९ जन्मेजयराजे भोसले
190721\img-20210718-wa0020.jpg
अन्नछत्र मंडळाचे संस्थापक जन्मेंजय महाराज भोसले यांचा फोटो