लोकमत न्यूज नेटवर्कपंढरपूर : पंढरपूर नगरपरिषदेचा २०१८-२०१९ या वर्षाचा अर्थसंकल्प जाहीर झाला असून, यामध्ये कोणतीही करवाढ केली नसल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.नगराध्यक्षा साधना भोसले यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषदेच्या सभागृहात विशेष सर्वसाधारण सभा झाली. मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी अंदाजपत्रक सादर केले.सर्वसाधारण सभेत २०१७-१८ चे सुधारित आणि २०१८-१९ च्या वार्षिक १०१ कोटी ६५ लाख ७० हजार २७० रुपये उत्पन्न आणि १०१ कोटी ६२ लाख ११ हजार ६५ रुपये अंदाजे खर्चासह तीन लाख ५९ हजार २०५ रुपयांच्या शिलकी अंदाजपत्रकास मंजुरी दिली.चौदावा वित्त आयोग, वैशिष्ट्यपूर्ण योजना, विशेष वैशिष्ट्यपूर्ण योजना, नगरोत्थान राज्यस्तर व जिल्हास्तर, रमाई आवास योजना, श्रमसाफल्य योजना, प्रधानमंत्री आवास योजना, अग्निशमन सुरक्षा अभियान, यमाई तलाव सुशोभीकरण, सुजल निर्मल अभियान, प्राथमिक सोयी-सुविधा विकास योजना, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी सुरक्षा योजनेसह रस्ते दुरुस्ती, नवीन पाईप खरेदी, रस्ते बांधणी, गटारे, नामसंकीर्तन सभागृह, नाट्यगृह, उद्यान विकास, पुतळ्याची सुधारणा व सुशोभीकरण, घनकचरा प्रकल्प, स्मशानभूमी सुधारणा, वाहन खरेदीसाठी तरतुदी केल्या. सरकारच्या निर्णयान्वये अनधिकृत बांधकाम नियमित करून अर्थसंकल्पातील नवीन लेखाशीर्ष तयार करून अनियमित विकास कर आकारण्यात यावा यासाठी महसुली जमेस ५० लाखांच्या तरतुदीचा आणि नगरपरिषदेच्या जुने जलकुंभ दुरुस्तीसाठी नव्या लेखाशीर्षात ३० लाखांच्या तरतुदीची सूचना स्थायी समितीपुढे ठेवली.------------------------सभा आटोपती घेतली जाणीवपूर्वक प्रश्न उपस्थित करून विरोधकांचा सभागृहात गोंधळ घालण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप सत्ताधाºयांनी केला. त्याच कारणावरुन अर्धा ते पाऊण तासात अंदाजपत्रकाला मंजुरी देत सभा आटोपती घेतली.---------------------सभागृहात सीसीटीव्ही बसवासभेचे संपूर्ण व्हिडीओ चित्रीकरण केले जावे, सभागृहात सीसीटीव्ही बसविण्याची पूर्तता का केली नाही, असा प्रश्न करून सभेचे कामकाज थांबविण्याचा प्रयत्न नगरसेवक महादेव भालेराव यांनी केला. सत्ताधाºयांकडून व नगरपरिषदेच्या अधिकाºयाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने विरोधकांनी मुख्याधिकारी अभिजित बापट यांना घेराव घातला.
करवाढ नसलेला पंढरपूर नगरपालिकेचा अर्थसंकल्प, घनकचरा प्रकल्प, स्मशानभूमी सुधारणा, वाहन खरेदीसाठी तरतुदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 9:45 AM
पंढरपूर नगरपरिषदेचा २०१८-२०१९ या वर्षाचा अर्थसंकल्प जाहीर झाला असून, यामध्ये कोणतीही करवाढ केली नसल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
ठळक मुद्देनगराध्यक्षा साधना भोसले यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषदेच्या सभागृहात विशेष सर्वसाधारण सभा झाली. मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी अंदाजपत्रक सादर केले.सर्वसाधारण सभेत २०१७-१८ चे सुधारित आणि २०१८-१९ च्या वार्षिक १०१ कोटी ६५ लाख ७० हजार २७० रुपये उत्पन्न आणि १०१ कोटी ६२ लाख ११ हजार ६५ रुपये अंदाजे खर्चासह तीन लाख ५९ हजार २०५ रुपयांच्या शिलकी अंदाजपत्रकास मंजुरी