आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ७ : प्रशासनाकडून सारे काही आलबेल असल्याचे सांगितले जात असताना गुरुवारी शाळकरी मुलीचा डेग्यूने बळी गेलेला असताना सोमवारी आणखी एका मुलाचा मुलाचा बळी गेल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. विकास शंकर गन्हावाले (वय- १२, रा. विद्यानगर, काळभैरव मठाजवळ, सोलापूर) असे मयत मुलाचे नाव आहे. शासकीय रुग्णालयात अन्य दोन रुग्णांवर अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरु आहेत. सुमेधा शिवशरण (वय- १२, रा. अक्कलकोट) आणि शैलेश सुधीर साळुंके (वय- २२, रा. सोलापूर) असे डेंग्यूसदृश्य आजारावर उपचार घेत असलेल्या रुग्णांचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून शहर-जिल्ह्यात सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे पाहणी दिसून येत आहे. खासगी आणि सरकारी दवाखान्यामध्ये उपचारांसाठी येणाºया रुग्णांच्या संख्येत वाढ दिसू लागली आहे. प्राथमिक केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, शासकीय रुग्णालयातील आरोग्य विभागाना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चार दिवसांपूर्वी सोलापुरातील मॉडर्न शाळेत शिकणारी सुकन्या विवेक इंगळे हिचा डेंग्यूने बळी गेलेला आहे. शासकीय रुग्णालयात उपचार करुन तिला मार्कंडेय रुग्णालयात उपचार चालू असताना तिच्या शरीरातील प्लेटलेटस् ६० हजारावर आल्याने ताप वाढून तिचा मृत्यू झाला. तपासणीत तिला ‘जापनीज इन्फेलायटीस’ (डेंग्यूचा प्रकार) आढळला होता. हा प्रकार ताजा असतानाच विकास गन्हावाले (वय- १२,रा. विद्यानगर, सोलापूर) डेंग्यूसदृश्य आजाराची लक्षणे आढळल्याने अश्विनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथून ३ आॅगस्ट रोजी पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयामध्ये दाखलकेले होते. त्याची तपासणी केली असता डेंग्यूची पॉझिटिव्ह लक्षणे आढळली. डॉक्टरांकडून केल्या जाणाºया उपचारास प्रतिसाद न मिळाल्याने सोमवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. या वृत्तामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. डेंग्यू सदृश्य आजाराची लक्षणे असलेल्या आणखी दोन रुग्णांवर सध्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. यात सुमेधा शिवशरण (वय- १२) ही अक्कलकोटची मुलगी असून, तिच्यावर बी ब्लॉक मधील बालरोग विभागातील अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरु आहे. तिची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. याशिवाय व्ही. एम. मेडिकल वैद्यकीय महाविद्यायात शिक्षण घेणारा विद्यार्थी शैलेश सुधीर साळुंके यालाही डेंग्यूची लागण झाली असून, बाहेरुन केलेल्या तपासणीत पाझिटिव्ह अहवाल आला आहे. शुक्रवारपासून शासकीय रुग्णालयामध्ये ए ब्लॉकमध्ये अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरु असून, रुग्णालयाच्या तपासणीमध्ये त्याचा अहवाल निगेटिव्ह असून, त्याच्यावर वैद्यकीय अधिकाºयांच्या देखेरेखाली उपचार सुरु आहेत. त्याची प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉ. विठ्ठल दडके यांनी स्पष्ट केले.
सोलापुरात डेंग्यूचा दुसरा बळी, आणखी दोघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2017 9:25 PM
सोलापूर दि ७ : प्रशासनाकडून सारे काही आलबेल असल्याचे सांगितले जात असताना गुरुवारी शाळकरी मुलीचा डेग्यूने बळी गेलेला असताना सोमवारी आणखी एका मुलाचा मुलाचा बळी गेल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. विकास शंकर गन्हावाले (वय- १२, रा. विद्यानगर, काळभैरव मठाजवळ, सोलापूर) असे मयत मुलाचे नाव आहे. शासकीय रुग्णालयात अन्य दोन रुग्णांवर अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरु आहेत. सुमेधा शिवशरण (वय- १२, रा. अक्कलकोट) आणि शैलेश सुधीर साळुंके (वय- २२, रा. सोलापूर) असे डेंग्यूसदृश्य आजारावर उपचार घेत असलेल्या रुग्णांचे नाव आहे.
ठळक मुद्देशहरात एकच खळबळ उडाली दोन रुग्णांवर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरुआरोग्य विभागाना सतर्क राहण्याच्या सूचना