यात सुमन आबा सरकाळे (वय ६१, रा, पारेवाडी- बोरवाडी, ता. आष्टी, जि. बीड, सध्या रा. शिंदे चाळ, राठोड ट्रान्सपोर्ट जवळ, उल्हासनगर, ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे.
सरकाळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, माझे माहेर पारेवाडी आहे. माझे माहेरचे नाव सुमन नामदेव देवकर असे आहे. वडील तीन वर्षापूर्वी मयत झाले आहेत. मोठा भाऊ दादासाहेब देवकर हा पोलीस खात्यामध्ये नोकरीस होता. त्याने स्वेच्छा निवृत्ती घेतलीअआहे. १९९४ मध्ये पारेवाडी येथील शेतीमधील ७५ आर जमीन भाऊ दादासाहेब देवकर यांच्याकडून खरेदी केली होती. जमीन खरेदी करतेवेळी आम्ही दुय्यम निबंधक कार्यालय, करमाळा येथे कायदेशीर दस्त नोंदवला होता. त्यावरून पारेवाडी येथील शेतीमधील ७५ आर क्षेत्राचे ७/१२ उताऱ्यास माझे नाव देखील लागले होते. परंतु मी नोकरीनिमित्त मुंबई येथे असल्याने जास्त काळ पारेवाडीकडे राहणे शक्य नव्हते.
----
दुसऱ्याला दिली जमीन
दरम्यान १९९६ मध्ये भाऊ दादासाहेब देवकर याने माझ्या मालकीची पारेवाडी येथील शेतीमधील जमीन ही माझ्या नावाने बोगस स्त्री दुय्यम निबंधक कार्यालय येथे उभी करून ती ही सुमन आबा सरकाळे असल्याचे भासवून ती जमीन मुक्ताबाई शिंदेला दस्त नोंदवून खरेदी करून दिली आहे.
---