सोलापूर : लोकसेवकांनी भ्रष्टाचार मुक्त कारभार केला पाहिजे, लोकांना त्रास होणार नाही अस वागुन काम करण आवश्यक आहे. तालुका पातळीवर ग्रामीण भागात ‘अॅन्टी करप्शन आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्न करणार असुन तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. शहर, जिल्ह्यातील भ्रष्ट अधिकाºयांवर जबर धाक बसेल असच आपल काम असणार आहे. लोकसेवकांनी प्रामाणिकपणे काम करावे असे आवाहन, सोलापूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे नुतन पोलीस उपअधिक्षक अजितकुमार जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
लाच लुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई मुख्यालयातील अजितकुमार जाधव यांनी शनिवारी पोलीस उपअधिक्षक म्हणुन सोलापुरचा पदभार स्विकारला. रविवारी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, लोकसेवकांमधुन होत असलेल्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची स्थापना झाली आहे. शासनाचा १00 रुपए पासुन अनुदान घेणाºया प्रत्येक लोकसेवकावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडुन कारवाई केली जाऊ शकते. सर्वसामान्य जनता शासनाच्या विविध योजना व अन्य कायदेशीर कामासाठी शासकीय कार्यालयात जात असतात. जनतेची कामे करण्यासाठी पैशाची मागणी होत असेल तर त्याला आळा घालण्यासाठी संबंधितावर पुराव्यानीशी कारवाई केली जाते असे अजितकुमार जाधव म्हणाले.
शहर, तालुकापातळीवर अशा अनेक तक्रारी येत असतात. ज्या उद्देशाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची स्थापना झाली आहे, तो अधिक प्रभावी ठरावा म्हणुन भविष्यात सोलापुर जिल्ह्यात ‘अॅन्टी करप्शन आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्याचा आपला संकल्प आहे. सध्या महाराष्ट्रात असा उपक्रम कोणत्याही जिल्ह्यात नाही, तो जर यशस्वी झाला तर सोलापुरातुन याची सुरूवात होईल. या उपक्रमासाठी एक व्हॅन तयार केली जाणार आहे. व्हॅन मध्ये एक राईटर, टेबल, लॅपटॉप, प्रिंटर, रेकॉर्डिंगची सोय आणि तक्रारदाराला बसण्याची सोय असणार आहे. टोल फ्री क्र. १0६४ वरून तक्रार आल्यास अॅन्टी करप्शनची व्हॅन संबंधित गावात जाईल. गाडीत सर्व प्रक्रिया पुर्ण करून तत्काळ लाच मागणाºया संबंधित कर्मचारी, अधिकारी व निवडुन आलेले पदाधिकारी यांच्यावर कारवाई केली जाणार आहे असेही अजितकुमार जाधव यांनी सांगितले.
मायभूमीत काम केल्याचा
मनस्वी आनंद : अरूण देवकर
- जिल्ह्यातील करमाळा हे माझ मुळ गाव याच ठिकाणी तीन वर्षाच्या कालावधीत अनेक धाडी टाकल्या, क्लास वन, क्लास टु आणि क्लास थ्रीच्या अधिकारी व कर्मचाºयांना लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले. भ्रष्टाचार रोखण्यासाठी जेवढ शक्य होईल तेवढ काम केलं. माझ्या गावात मी काम केल्याच मला मनस्वी आनंद होत आहे अशी प्रतिक्रिया सोलापुरातुन मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागात बदली झालेले अरूण देवकर पत्रकारांशी बोलताना दिली.