शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

प्रतिक हत्याकांड ; गळा कापलेल्या चाकूवर आढळले पाच जणांचे ठसे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2018 2:22 PM

पाच जणांचा खुनात समावेश : जुन्या वाड्यातील खड्ड्यात पोलिसांना सापडले शस्त्र 

ठळक मुद्देपोलिसांनी तपासकामी सर्व तांत्रिक बाबीचा आधार घेत योग्य दिशेने तपास सुरू घटनेच्या दरम्यान ज्या ज्या व्यक्तीचे मोबाईल नंबर टॉवरवर आले आहेत, त्यांची सखोल चौकशी सुरू तपासाची चक्रे फिरवल्याने बºयापैकी हत्याकांडाचा उलगडा होण्यास मदत

मंगळवेढा : प्रतीकचे हत्याकांड हा नरबळीचा प्रकार असल्याने पोलीस प्रशासन तपासकामी सावधपणे पाऊले उचलत आहे. तपासाची गती पाहता हे हत्याकांडाचे गूढ आज, उद्या उकलण्याची शक्यता विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली. या हत्याकांडात गळा कापण्यासाठी वापरण्यात आलेला चाकू पोलिसांच्या हाती लागला असून, त्या चाकूवर पाच जणांचे ठसे निदर्शनास आले आहेत. त्यावर असणाºया ठशाची पडताळणी करण्यात पोलिसांना बºयापैकी यश आले आहे. 

मारेकºयांनी हा चाकू दुसºयाकडून मागून आणला असून त्यावर देणाºयाचेही ठसे आढळले आहेत. या नरबळीमध्ये पाच ते सात जणांचा सहभाग असल्याचे तपासाअंती पुढे येत असून गळा चिरताना  आरडाओरडा करू नये, यासाठी प्रतीकच्या तोंडात बोळा घातला असल्याची माहिती तपासातून पुढे येत आहे. गावातीलच एका जुन्या वाड्यात पोलिसांनी तपासणी केली असता, त्यांना घराच्या एका बाजूस खड्डा खोदून तो बुजविला असल्याचे दिसून आले.

बुजविल्याची बाजू दिसू नये, यासाठी शेणाने सारवण्यात आल्याचेही आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्या कुटुंबातील सदस्यांची चौकशी केल्याने बºयापैकी माहिती मिळाली आहे. प्रतीकचा नरबळी हा मंगळवारच्या दरम्यान दिला असण्याची शक्यता आहे. त्याला तीन दिवस खुन्यांनी दुसरीकडे ठेवून मंगळवारी त्या उसात हत्या केल्याची माहिती पुढे येत आहे. प्रतीक शिवशरण या चिमुरड्याची हत्या झाल्यानंतर बालकांसह पालकांपर्यंत सगळ््यांनी धास्ती घेतली असून, पोलीस आपल्या पद्धतीने तपास करीत असले तरी पालकांतून याचा लवकरात लवकर छडा लागण्याची मागणी जोर धरत आहे. 

गळा चिरताना पाच फूट रक्त उडालेप्रतीकचा गळा चिरताना बाहेर आलेले रक्त पाच फुटापर्यंत उसाच्या पालावर उडाले असून, तो रक्ताळलेला पाला पोलिसांनी जप्त केला आहे. डावा पाय कापून काढताना मात्र मोठ्या धारधार शस्त्राचा वापर केला असल्याची शंका आहे. ते शस्त्र मात्र अद्याप मिळाले नाही व तो पायही मिळाला नाही.

अनेकांच्या उरात धडकी- पोलीस अधीक्षक मनोज पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार, पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी चार दिवस तपासाची चक्रे फिरवल्याने बºयापैकी हत्याकांडाचा उलगडा होण्यास मदत मिळाली आहे. कोणी निरपराध अडकू नये, त्याला त्रास होऊ नये, याची दक्षता घेतली आहे. पोलिसांच्या चौकशीसत्राने अनेकांच्या उरात धडकी भरली आहे.

तांत्रिक बाबींचा वापर- पोलिसांनी तपासकामी सर्व तांत्रिक बाबीचा आधार घेत योग्य दिशेने तपास सुरू ठेवला आहे. घटनेच्या दरम्यान ज्या ज्या व्यक्तीचे मोबाईल नंबर टॉवरवर आले आहेत, त्यांची सखोल चौकशी सुरू केली आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस