सांगोला तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. त्यानंतर तुरळक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. आता पुन्हा तापमानात वाढ झाली असून नागरिकांना उन्हाच्या झळा बसताना दिसत आहे. त्यामुळे शरीरात उष्णतेचे प्रमाण वाढल्यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळत आहे.
चक्कर येणे, डोकेदुखी, त्वचेच्या विकारात उन्हाळ्यात वाढ होत असते. भरपूर पाणी पिल्यास डिहायड्रेशनचे प्रमाण कमी होते. शहरात चार दिवसांपासून तापमानात सतत वाढ होत आहे. गेल्या चार दिवसांत तीन अंशांनी तापमान वाढले असून एप्रिल-मे महिन्यांत तापमान ४५ अंशांहून अधिक जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कोट ::::::::::::::::
दुपारी कडक उन्हाचा कडाका तर रात्री थंडावा जाणवत असल्याने आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ होत आहे. उन्हामुळे एप्रिल-मे महिन्यांत साथीच्या रोगांसह त्वचेच्या विकारामध्येही वाढ होते. त्यामुळे वेळीच खबरदारी घेत उपचारपद्धती केल्यास पुढे होणारा धोका टळू शकतो.
- डॉ. वैभव जांगळे
सांगोला