सोलापूर बाजार समितीच्या एकूणच कारभारावर नाराजी व्यक्त करताना चोरेकर यांनी कर्मचारी व व्यापाऱ्यांसाठीच निर्णय होतात मात्र शेतकरी योजना मंजूर करण्यासाठी धडपड कोणी करीत नसल्याचा आरोप चोरेकर यांनी केला. फळबागा असलेल्या शेतकऱ्यांना मोफत कॅरेट द्या अशी मागणी संचालक सभेत केली मात्र काहीच उपयोग झाला नसल्याचे चोरेकर म्हणाले. संचालक मंडळाच्या सभेत शेतकरी निवास, हाॅस्पिटल हे विषय उपस्थित केले मात्र हे व इतर एकही शेतकऱ्यांचा विषय तीन वर्षांत मार्गी लागला नसल्याचे चोरेकर म्हणाले. तीन वर्षांत एकही विकास काम झाले नाही किमान राहिलेल्या दोन वर्षांत विकास कामाची पाटी लागू द्या असे मी सभापती विजयकुमार देशमुख यांना म्हणाल्याचे संचालक चोरेकर यांनी सांगितले.
---
पावणेदोन वर्षे राहिलीत..
सोलापूर बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीनंतर १६ जुलै २०१८ रोजी सभापती, उपसभापतींची निवड झाली होती. आता त्याला तीन वर्षाचा कालावधी उलटला आहे. आणखीन पावणेदोन वर्षे राहिलीत ती कशीबशी निघून जातील मात्र शेतकऱ्यांसाठी काय काम केले?, याचे उत्तर नाही, असेही संचालक चोरेकर म्हणाले.
---
मंद्रुप व वडाळा उपबाजार साठीच्या ठरावाचा एक कागद आमच्याकडे दिला होता. सोबत कागदपत्रे जोडण्यासाठी पत्र दिले मात्र, त्याची पूर्तता सोलापूर बाजार समितीने केली नाही. आता नव्याने स्मरणपत्र देत आहोत.
- कुंदन भोळे, जिल्हा उपनिबंधक सोलापूर
---