ग्रामीण भागात पूर्णवेळ आरोग्य पथके तैनात केली असून, ग्रामस्तरीय समितीचीही स्थापना केली आहे. बाधित रुग्णांना तत्काळ वैद्यकीय सुविधा, त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन तपासणी करावी. गावातील रस्ते, नाल्या स्वच्छ ठेवावीत, गावांत कुठेही अस्वच्छता होणार नाही, याची दक्षता घ्यावी. दुकानदार, फळ, भाजीपाला, दूध विक्रेत्यांशी संवादच्या माध्यमातून जनजागृती करावी. संबंधित गावात एखादा बोगस डॉक्टर असल्यास तत्काळ आरोग्य विभागाला माहिती द्यावी. आपल्या कार्यक्षेत्रात सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय ठेवून आवश्यक उपाययोजन कराव्यात, अशा सूचना घोडके यांनी दिल्या.
कोट :::::::::::::::::::::::
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी प्रशासनाकडून ‘माझं गांव कोरोनामुक्त गांव’, ‘माझे दुकान-माझी जबाबदारी’ अशा अनेक उपक्रमाद्वारे प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. जिल्हा प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. नागरिकांनी कोरोनाबाबत दिलेल्या सूचनांचे पालन करावे. कोरोना प्रतिबंधित लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा.
- रविकिरण घोडके
गटविकास अधिकारी, पंढरपूर